ब्रम्हपुरीवर धूसर ढगांचे पांघरूण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:16 IST2021-03-29T04:16:32+5:302021-03-29T04:16:32+5:30
नागरिक संभ्रमात : दुपारपर्यंत स्थिती राहिली कायम ब्रम्हपुरी : रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अचानक ब्रम्हपुरीवर धूसर ढगांचे पांघरूण ...

ब्रम्हपुरीवर धूसर ढगांचे पांघरूण
नागरिक संभ्रमात : दुपारपर्यंत स्थिती राहिली कायम
ब्रम्हपुरी : रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास अचानक ब्रम्हपुरीवर धूसर ढगांचे पांघरूण ओढवल्याने नागरिकांत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती.
सध्या कोरोनाचे संकट उभे असून अजून पुन्हा दुसरे कोणतेही संकट नको रे बा!अशी प्रार्थना केली जात आहे. अशातच रविवारी सकाळी संपूर्ण ब्रम्हपुरी शहरावर व आजूबाजूच्या २० किमी परिसरावर अचानक धूसर हवेचे ढग आल्याने काही नागरिक संभ्रमात पडले. काही नागरिकांनी तर हे कशामुळे होत आहे, हे जाणून घेण्यासाठी भुगोल अभ्यासकांना फोन करून विचारणा केली.
ब्रह्मपुरीत सकाळपासून या बाबीची चर्चा केली जात होती. दरम्यान, हे धूसर ढग दुपारनंतर आपोआप हटून गेले. व वातावरण स्वच्छ निर्माण झाले होते.
बॉक्स
वातावरणीय बदल की जवळपास आगीचे तांडव
या घटनेवरून काही अभ्यासकांनी आपली मते मांडली. काहींचे म्हणणे असे की काल-परवापर्यंत पाऊस पडला, व अचानक तापमानात वाढ झाली. याचा हा वातावरणीय परिणाम असावा तर काहींनी जवळपास कुठेतरी मोठ्या प्रमाणात आग लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला.