रस्त्यावरील मोकाट जनावरांना आवरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:28 IST2021-04-02T04:28:58+5:302021-04-02T04:28:58+5:30

चंद्रपूर : मागील काही दिवसापासून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसभर झाडांच्या सावलीचा आसरा घेणारे मोकाट जनावरे ...

Cover the stray animals on the road | रस्त्यावरील मोकाट जनावरांना आवरा

रस्त्यावरील मोकाट जनावरांना आवरा

चंद्रपूर : मागील काही दिवसापासून तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसभर झाडांच्या सावलीचा आसरा घेणारे मोकाट जनावरे रात्रीच्या सुमारास रस्त्यावर ठाण मांडून बसत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता महापालिकेतील संबंधित विभाग

दिवसभर रस्त्यावरील जनावरे पकडतात. मात्र रात्रीचे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मागील आठवडाभरापासून उन्ह वाढत आहे. गरम वारे वाहू लागले आहे. त्यामुळे रात्री जनावरे रस्त्यावर बसून ठाण मांडत आहे.

काही दिवसापासून महापालिकेतील एक विभाग यावर कारवाई करीत आहे. मात्र अद्यापही मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात त्यांना यश आले नाही. शहरात वाहनांची सतत वर्दळ असते. याशिवाय शहरातून सर्वच रस्त्यांवर कुठे ना कुठे ही जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसत असल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांवरील खड्डे चुकवित वाहन चालविणाऱ्या वाहनधारकांना आता मोकाट जनावरांमुळे अपघात होणार नाही, याचीही काळजी घ्यावी लागत आहे. पालिका प्रशासनाने या मोकाट जनावरांना बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: Cover the stray animals on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.