फसवेगिरी करणाऱ्या पती-पत्नीची न्यायालयीन कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:25 IST2021-04-19T04:25:31+5:302021-04-19T04:25:31+5:30
तपासादरम्यान आरोपीने पोलिसांना यात गुंतलेल्या काही महिलांची नावे सांगितली आहेत. त्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. आठ दिवस ...

फसवेगिरी करणाऱ्या पती-पत्नीची न्यायालयीन कोठडी
तपासादरम्यान आरोपीने पोलिसांना यात गुंतलेल्या काही महिलांची नावे सांगितली आहेत. त्यांची कसून चौकशी करण्यात येणार आहे. आठ दिवस पोलीस कोठडीत राहिलेल्या महिला आरोपीने दुपटीने पैसे देण्याच्या नावाखाली महिलांकडून लाखो रुपये हडपल्याचे कबूल केले आहे. तसेच तिने फसवणुकीच्या प्रकरणात गुंतलेल्या काही महिलांची नावेही उघड केली आहेत. याच महिलांना हडपलेली रक्कम दिली गेली आहे, असे पोलिसांना तपासादरम्यान सांगितले आहे. याशिवाय आणखी काही महत्त्वाचे सुगावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. तिसऱ्यांदा मिळालेली दोन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी तिची पतीसह न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. गोरगरीब महिलांनी भविष्य निर्वाहकरिता बचत केलेली पुंजी सुजाता बाकडे या महिलेने हडपली हे निष्पन्न झाले असले तरी या महिलेने लुटलेली रक्कम कुठे व कोणाकडे ठेवली आहे हे हुडकून काढण्याचे दुर्गापूर पोलिसांपुढे मोठे आव्हान आहे. सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर यांचा कसून तपास सुरू आहे.