बलशाली राष्ट्रासाठी शौर्य प्रशिक्षण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 11:44 PM2018-05-29T23:44:58+5:302018-05-29T23:44:58+5:30

आपल्या देशाला शौर्याचा प्रगल्भ इतिहास लाभला आहे. अनेक महापुरुषांनी आपल्या पराक्रमाने वीरश्री गाजविली आहे. छत्रपती शिवराय, महाराणा प्रतापांसारखे शौर्य गाजवणारे योद्धे या देशात निपजलेत. वैचारिक समृद्धतेबरोबरच निरोगी स्वास्थ्य, बल आणि शौर्यसमृद्ध अशा युवकांची देशाला नितांत आवश्यकता असल्याने शौर्य प्रशिक्षण शिबिर काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.

Courage training is needed for a powerful nation | बलशाली राष्ट्रासाठी शौर्य प्रशिक्षण गरजेचे

बलशाली राष्ट्रासाठी शौर्य प्रशिक्षण गरजेचे

Next
ठळक मुद्देहंसराज अहीर : सैनिकी शाळेमध्ये शौर्य प्रशिक्षण शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : आपल्या देशाला शौर्याचा प्रगल्भ इतिहास लाभला आहे. अनेक महापुरुषांनी आपल्या पराक्रमाने वीरश्री गाजविली आहे. छत्रपती शिवराय, महाराणा प्रतापांसारखे शौर्य गाजवणारे योद्धे या देशात निपजलेत. वैचारिक समृद्धतेबरोबरच निरोगी स्वास्थ्य, बल आणि शौर्यसमृद्ध अशा युवकांची देशाला नितांत आवश्यकता असल्याने शौर्य प्रशिक्षण शिबिर काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
शौर्याच्या इतिहासातून प्रेरणा आणि बोध घेत भावी पिढीमध्ये हे गुण रुजविण्यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल विदर्भ प्रांताच्या वतीने २३ मे ते ३० मेपर्यंत स्थानिक सैनिकी शाळेमध्ये शौर्य प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. या शबिराला शुक्रवारी अहीर यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. याप्रसंगी वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष डॉ.शरदचंद्र सालफळे, डॉ. हरीश सालफळे, उपमहापौर अनील फुलझेले, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष रोडमल गहलोत, बजरंग दलाचे पराग दवंडे, राजेंद्र खांडेकर, प्रा. रवी जोगी व अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
बलशाली राष्ट्रासाठी शौर्य प्रशिक्षण उपयुक्तय असल्याचे सांगून संस्कारक्षम पिढी घडविण्यास शिबिर मोलाचे ठरणार आहे. युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, राष्ट्रसंरक्षा, समाजसेवा, वीरश्री आदी गुणांबरोबरच एकसंघ राष्ट्र उभारणीसारख्या संस्काराची बीजे शिबिराच्या माध्यमातून रुजविण्याचे कार्य घडेल, असा विश्वास अहीर यांनी व्यक्त केला. शिबिरात युवकांनी गृहराज्यमंत्री अहीर यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली
राष्ट्रहित समर्पित कार्य
प्रत्येक युवकाने शरीर व बुद्धी सौष्ठवाबरोबरच शस्त्र विद्येचे ज्ञान अंगिकारुन ते ज्ञान राष्ट्रहितालाच समर्पित करावे. सशक्त, निरोगी आणि सेवाभावी युवक राष्ट्राची गरज आहे. शरीर मजबूत ठेवूनच देशाची सेवा करणे शक्य आहे. या शिबिरातून चांगले विचार आत्मसात करण्याची संधी लाभली आहे, युवकांनी या संधीचे सोने करावे, असे आवाहन हंसराज अहीर यांनी केले.

Web Title: Courage training is needed for a powerful nation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.