शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

लग्नपत्रिकेतून 'त्यांनी' जपला ऐतिहासिक वारसा; आगळ्यावेगळ्या पत्रिकेची सोशल मीडियावर चर्चा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 17:22 IST

लग्नाचे निमंत्रण आता सोशल मीडियावरूनच, घरोघरी पत्रिका देण्याची प्रथा होतेय इतिहासजमा

चंद्रपूर :लग्न सोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो. लग्नाची तारीख आणि मुहूर्त ठरल्यावर सर्वात आधी तयार केली जाते ती लग्नाची पत्रिका. कुलदेवतेला निमंत्रण पत्रिका ठेवून मग इतरांना निमंत्रण देण्यास सुरुवात केली जाते; परंतु सध्याचे डिजिटल युग आणि सोशल मीडियाच्या काळामध्ये नातेवाईक, सगेसोयरे, मित्र परिवाराला लग्नसमारंभाचे आग्रहाचे निमंत्रण पत्रिका घरी नेऊन देण्याची प्रथा इतिहास जमा होत असून, आता सोशल मीडियाच्या माध्यमातूनच लग्नाचे निमंत्रण दिले जात आहे.

सोशल मीडियावरून लग्नपत्रिका पाठविली जात असली तरी पत्रिकांमध्ये काही वेगळे करण्याचा अनेकांचा कल असतो. चंद्रपुरातील इको-प्रो या संस्थेचे सदस्य असलेल्या सुनील मिलाल यांनी चंद्रपुरातील ऐतिहासिक वारशाविषयी जनजागृती संदेश देणारी आपली लग्नपत्रिका छापली. या पत्रिकेमध्ये चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियान, किल्ल्याचे जतन, संवर्धन, गोंडकालीन किल्ल्यासंदर्भात माहिती दिली आहे. या किल्ल्याची माहिती आपल्या कुटुंबीय, नातेवाइकांना व्हावी, यासाठी ऐतिहासिक वास्तू संवर्धनाचा संदेश देणारी त्यांनी पत्रिका छापल्याचे सांगितले.

आग्रहाचे निमंत्रण

अनेक कुटुंबीय पहिली पत्रिका देवापुढे ठेवतात. यासाठी म्हणून काहीजण लग्नपत्रिका छापत आहेत. मात्र, आजही काही खास व्यक्तींना पत्रिका घरोघरी नेऊन देत आग्रहाचे निमंत्रण देत आहेत. 

साधारणत: दिवाळीनंतर लग्नसराईला सुरुवात होते. मात्र, मागील दोन वर्षांमध्ये कोरोना संकटानंतर मात्र सर्वच प्रथा बदलून गेल्या आहेत. आता कोरोना निर्बंध उठल्यामुळे धूमधडाक्यात पूर्वीसारखे लग्न सोहळे पार पडत आहे. लग्न म्हटले की, वधू-वरांकडील मंडळीची दोन ते तीन महिन्यांपूर्वीपासून तयारी केली जाते. लग्नपत्रिका अनोखी असावी, असा आग्रह अनेक कुटुंबाचा असतो. आकर्षक आमंत्रण पत्रिका देण्याकडे अनेकांचा कल असतो. त्याचेही खास ट्रेड बघायला मिळते. 

काळाच्या ओघात पत्रिकेचे स्वरूप बदलले आहे. लग्नाचे आमंत्रण आता सोशल मीडियावरून दिले जात आहे. यामुळे वधू-वरांच्या कुटुंबीयांचा बराच वेळ आणि त्राससुद्धा वाचत आहे. मात्र, यामुळे काही प्रमाणात प्रिंटिंग व्यवसायाला फटका बसत आहे. 

टॅग्स :Socialसामाजिकmarriageलग्नchandrapur-acचंद्रपूर