चंद्रपुरात पार पडली वैदर्भीय नेत्रतज्ज्ञांची परिषद

By Admin | Updated: December 2, 2015 00:52 IST2015-12-02T00:52:28+5:302015-12-02T00:52:28+5:30

विदर्भ आॅप्थॉलपीक सोसायटीच्यावतीने घेण्यात येणारी नेत्रतज्ज्ञांची वार्षिक परिषद प्रथमच चंद्रपुरात घेण्याचा मान येथील नेत्रतज्ज्ञांना मिळाला.

The Council of Vector Ophthalmologists crossed the moon | चंद्रपुरात पार पडली वैदर्भीय नेत्रतज्ज्ञांची परिषद

चंद्रपुरात पार पडली वैदर्भीय नेत्रतज्ज्ञांची परिषद

चंद्रपूर: विदर्भ आॅप्थॉलपीक सोसायटीच्यावतीने घेण्यात येणारी नेत्रतज्ज्ञांची वार्षिक परिषद प्रथमच चंद्रपुरात घेण्याचा मान येथील नेत्रतज्ज्ञांना मिळाला.
ही परिषद शनिवार व रविवार असे दोन दिवस आयोजित होती. या कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या हस्ते झाले. देशातील विख्यात नेत्रतज्ज्ञांनी या परिषदेत मार्गदर्शन केले. शस्त्रक्रियांचे थ्री-डी व्हीडीओ प्रदर्शन हे या कार्यक्रमाचे आकर्षण ठरले. वेगवेगळ्या विषयांवर वादविवाद स्पर्धा ठेवून वोटिंग पॅडनी वोट करण्याची सुविधा पण या परिषदेत ठेवण्यात आली होती.
जवळपास ३७५ तज्ज्ञ या परिषदेला उपस्थित होते. नागपूर, अमरावती, अकोला, वर्धा, भंडारा, यवतमाळ, वाशिम या ठिकाणाहून डॉक़्टर्स परिषदेस आले होते.
ही संपूर्ण परिषद विदर्भ नेत्रतज्ज्ञ संघटनेच्या अध्यक्ष डॉ. रेखा दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. प्रकाश मामीडवार आणि डॉ. दीपक निलावार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. संघटनेच्या सचिव डॉ. रत्ना विश्वकर्मा, कोषाध्यक्ष डॉ. राजेंद्र विश्वकर्मा आणि सायंटीफीक चेअरमन डॉ. राजेश जोशी यांचे सहकार्य लाभले.
विदर्भ नेत्रतज्ज्ञ संघटनेचे सचिव व कोषाध्यक्ष डॉ. संदीप मुनगंटीवार, डॉ. ओस्वाल, डॉ. उमेश अग्रवाल, डॉ. रश्मी सरदेशपांडे, डॉ. हर्ष मामीडवार, डॉ. अमित मामीडवार, डॉ. मिनाज शरीफ, डॉ. चेतन कुटेमाटे, डॉ. सिद्धमशेट्टीवार, डॉ. मोहितकर, डॉ. सतिश घानके, डॉ. झिनी पटेल इत्यादी तज्ज्ञांनी ही परिषद यशस्वी करण्याकरिता सहकार्य केले.
या कार्यशाळेला जिल्ह्यातील नेत्रतज्ज्ञ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: The Council of Vector Ophthalmologists crossed the moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.