नोटाबंदीच्या नावावर कापसाची कवडीमोलात विक्री
By Admin | Updated: December 29, 2016 02:10 IST2016-12-29T02:10:12+5:302016-12-29T02:10:12+5:30
कोरपना तालुक्यात कापूस खरेदीला प्रारंभ झाला आहे. मात्र नोट बंदीच्या नावावर ४ हजार ४०० ते ४

नोटाबंदीच्या नावावर कापसाची कवडीमोलात विक्री
शेतकऱ्यांची लूट : कोरपना तालुक्यातील प्रकार, प्रशासनाने लक्ष द्यावे
गडचांदूर : कोरपना तालुक्यात कापूस खरेदीला प्रारंभ झाला आहे. मात्र नोट बंदीच्या नावावर ४ हजार ४०० ते ४ हजार ५०० रुपये अशा कवडीमोल दराने कापूस खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांची लूट होत आहे.
कोरपना तालुका हा आदिवासी तालुका असून येथील अनेक शेतकरी दारिद्र्यरेषेखालील आहेत. बहुतांश जनता शेती करून आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाह करतो. सध्या कापूस निघाला असून अनेक शेतकरी विक्री केंद्रावर कापूस नेत आहेत. मात्र नोट बंदीचा गैरफायदा घेत तेलंगाना, यवतमाळ, वर्धा व इतर जिल्ह्यातील कापूस खरेदीदार आदिवासी शेतकऱ्यांच्या घरी घरी जाऊन नगदी चुकारे देण्याचे आमिष दाखवून ४२०० ते ४५०० रुपयात कापूस खरेदी करीत आहेत. सध्या कापसाचे दर ५ हजार १५० ते ५ हजार २०० रूपये आहे. व्यापाऱ्याजवळ कोणताही परवाना नसताना हे व्यापारी सर्रास कवळीमोल भावाने कापूस खरेदी करीत आहेत. यामुळे योग्य भावात खरेदी करणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यावर उपासमारीची पाळी आली आहे. तरी परिसरातील कापूस खरेदी व्यवहाराची चौकशी करून अवैध व्यापाऱ्यावर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी भाजपा कोरपणा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, कवडु जरीले, विशाल गज्जलवार, अरुण मडावी, पुरूषोत्तम भोंगळे, नथ्थु ढवस, मनोहर कुळसंगे, पुरुषोत्तम निब्रड, लक्ष्मण चाहाकाटे, समीर पटेल, शेख रिजवाण, अनिल कौरासे, संजय ठाकूर, वसंता बहीरे, नमदेव खाडे, अभिनव रेगुडांवार, अनिल मडावी, जोतिराव मंगाम आदींनी केली आहे. (वार्ताहर)