वरोऱ्यात कापसाची आवक वाढली

By Admin | Updated: December 23, 2014 23:00 IST2014-12-23T23:00:18+5:302014-12-23T23:00:18+5:30

कापसाला जागतिक बाजारपेठेत मागणी नसल्याने यानंतर कापसाला दरवाढ होणे कठीण आहे. यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातच वरोरा व्यापारपेठेत एकाच दिवशी

Cotton increased in the curve | वरोऱ्यात कापसाची आवक वाढली

वरोऱ्यात कापसाची आवक वाढली

वरोरा : कापसाला जागतिक बाजारपेठेत मागणी नसल्याने यानंतर कापसाला दरवाढ होणे कठीण आहे. यावर्षी कपाशीच्या पेऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातच वरोरा व्यापारपेठेत एकाच दिवशी सात हजार क्विंटल कापूस विक्रीसाठी बाजारात आला. यावर्षात मोठ्या प्रमाणात कापसाची आवक वरोरा बाजारपेठेत आल्याने मागील अनेक वर्षांपासून वरोरा कापसाची बाजारपेठ मागे पडली. आता वरोरा कापूस बाजारपेठेला चांगले दिवस आल्याने रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे इतरही व्यवसाय तेजीत आल्याचे मानले जात आहे.
मागील काही दशकात वरोरा ही कापसाची बाजारपेठ म्हणून ओळखली जात होती. वरोरा शहरात चार, माढेळी, शेगाव येथे जिनिंग फॅक्टरी होत्या. त्यामुळे अनेक कुटुंबांना कायम स्वरूपी रोजगार मिळाला होता. परंतु आधुनिकीकरणात या सर्वच जिनिंग फॅक्टरी बंद पडल्या. त्या जागेवर निवासस्थाने झाल्याने अनेक कुटुंबाचे रोजगार हिसकाविल्या गेला. त्यामुळे मागील कित्येक वर्षांपासून कापसाची वरोरा येथील बाजारपेठ नामशेष झाली होती. त्यामुळे वरोरा शहरातील इतर व्यवसायिकांनाही त्याचा फटका बसला.
सध्या वरोरा शहरात दोन व माढेळी येथे एक जिनिंग खाजगीरित्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अनेक कापूस उत्पादक शेतकरी वरोरा परिसरातील कापूस व्यापारपेठेकडे वळले आहे. वरोरा परिसरात जिनिंग सुरू झाल्याने कापसाच्या पेऱ्यातही मागील काही वर्षात वाढ झाली आहे. शासनाने यावर्षी कापसाला ४ हजार ५० रुपये प्रति क्विंटल भाव दिला आहे. हा भाव कमी असला तरी कापूस उत्पादकांना आता पर्याय नाही. या भागात उत्पादन खर्चही निघणे कठीण आहे. त्यामुळे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्याने कापसाला भाव वाढ मिळेल किंवा बोनस मिळेल या आशेने शेतकरी आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यासारखे आहे. कापूस दर वाढीची घोषणा होईल या आशेवर कापूस उत्पादक आहे. अनेकांनी कापूस मोठ्या प्रमाणात घरात साठवून ठेवला. अधिक दिवस झाल्यास कापसाची प्रतवारी खराब होत आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी कापूस विकायला सुरूवात केली. कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा अंतर्गत कापसाची आवक वाढली आहे.
१९ डिसेंबरला ७ हजार क्विंटल कापूस व्यापारपेठेत आला असल्याने ही आवक विक्रमी मानली जात आहे. मागील कित्येक वर्षात वरोरा परिसरातील कापसाच्या व्यापारपेठेवर आलेली मरगळ आता दूर होणार आहे. जागतिक बाजारपेठेत कापूस गाठीला मागणी नसल्याने निर्यात बंद आहे. त्यामुळे कापसाचे दर वाढण्याची शक्यता धूसर आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Cotton increased in the curve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.