कापूस पिकाने दिला शेतकऱ्यांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST2021-01-13T05:12:08+5:302021-01-13T05:12:08+5:30
जिल्ह्यात धान, हळद, सोयाबीन व कापसाची लागवड केली जाते. यावर्षी धान तसेच कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. ...

कापूस पिकाने दिला शेतकऱ्यांना धोका
जिल्ह्यात धान, हळद, सोयाबीन व कापसाची लागवड केली जाते. यावर्षी धान तसेच कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. यावर्षी हळद व सोयाबीन पिकातही घट आल्यामुळे व तसेच या पिकांना विविध रोगाने ग्रासल्यामुळे या पिकांचेही उत्पन्न घटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चंद्रपूर शहरात अतिक्रमण वाढले
चंद्रपूर : येथील बाबूपेठ, लालपेठ, नगिनाबाग परिसरातील काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे. यासंदर्भात निवेदनही दिले आहे. मात्र अद्यापही कारवाई झाली नाही. त्यामुळे रस्त्यावर दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.