अर्जुनी येथे कापुस पीक शेतीशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:56 IST2020-12-11T04:56:20+5:302020-12-11T04:56:20+5:30
वरोरा : तालुका कृषी अधिकारी, वरोरामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत वरोरा तालुक्यातील अर्जुनी येथे कापूस पीक शेतीशाळा ...

अर्जुनी येथे कापुस पीक शेतीशाळा
वरोरा : तालुका कृषी अधिकारी, वरोरामार्फत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत वरोरा तालुक्यातील अर्जुनी येथे कापूस पीक शेतीशाळा व शेतीदिन कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाला उपविभागीय कृषी अधिकारी आर. टी. जाधव, तालुका कृषी अधिकारी व्ही. आर. प्रकाश, मंडळ कृषी अधिकारी व्ही. पी. काळे, तालुका शेतकरी सल्लागार समितीचे अध्यक्ष सुरेश बापूराव गरमडे, अंबुजा सिमेंट फाऊंडेशनचे स्वप्नील बल्की, दिनेश वांढरे, विठ्ठल निब्रड आदी उपस्थित होते.
प्रथमतः शेतीशाळा प्रतिज्ञा, गुरुदेव प्रार्थना व मागील वर्गात घेण्यात आलेल्या विषयांचा मागोवा घेण्यात आला. त्यानंतर कापुस पीक परिसंस्थेचे निरीक्षणे-शेतकरी गटाद्वारे पिकाचे निरीक्षण व नोंदी घेण्यात आल्या. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी जाधव यांनी शेतकऱ्यांनी वैविध्यपूर्ण शेती पध्दतीचा अवलंब करुन उन्नती करावी, असे आवाहन केले. तर तालुका कृषी अधिकारी प्रकाश यांनी विकेल ते पिकेल योजनेची विस्तृत माहिती दिली. मंडळ कृषी अधिकारी विजय काळे यांनी कापुस पिकावरील गुलाबी बोंड अळीचे नियंत्रण आदी विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी उत्कृष्ठ प्रशिक्षणार्थी निखिल जुंबाडे, प्रमोद कुंभारे, उद्धव वाढई, मनोज चवरे यांना पुरस्कृत करण्यात आले. संचालन विशाल घागी तर आभार कृषी सेवक पवन मत्ते यांनी मानले.