खुल्या जागेवर इंजेक्शन व औषधांच्या बाटल्यांचा खच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:37 IST2021-02-05T07:37:23+5:302021-02-05T07:37:23+5:30
जिवती : नगर पंचायत क्षेत्रात जिवती ते शेणगाव मार्गावर मुदतबाह्य इंजेक्शन व औषधीच्या बाटल्या खुल्या जागेवर फेकलेल्या आहेत. या ...

खुल्या जागेवर इंजेक्शन व औषधांच्या बाटल्यांचा खच
जिवती : नगर पंचायत क्षेत्रात जिवती ते शेणगाव मार्गावर मुदतबाह्य इंजेक्शन व औषधीच्या बाटल्या खुल्या जागेवर फेकलेल्या आहेत. या ठिकाणी जनावरे चाऱ्याच्या शोधात फिरत असल्यामुळे त्यांना धोका होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिवती नगर पंचायत मुख्याधिकारी, अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्याशी याबाबत संपर्क केला असता त्यांनीही भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. या वस्तूंचा बंदोबस्त करणार असल्याचे ते म्हणाले. दररोज सकाळी नगर पंचायतच्या गाड्या शहरात फिरून कचरा गोळा करतात. या वस्तू त्यात टाकायला हव्या, असेही मुख्याधिकारी कविता गायकवाड म्हणाल्या. काही आौषधी मुदतबाह्य असून काही वापरलेली आहेत. ही औषधी व वापरलेले इंजेक्शन येथे कुणी असे उघड्यावर टाकली, याबाबत उलगडा झाला नाही. बोगस डॉक्टरांचा हा प्रताप असावा, असेही बोलले जात आहे. या ठिकाणी मुदत संपलेले ब्रेडचे पुडे आणि हेअर कटिंग दुकानातील कापलेले केससुद्धा पोत्यात भरून टाकले आहेत.
कोट
सदर प्रकार लक्षात आला आहे. याची आम्ही विल्हेवाट लावू. तसेच असा प्रकार यापुढे होणार नाही याची काळजी घेत संबंधितांना नोटीस बजावणार आहे.
- कविता गायकवाड
मुख्याधिकारी न.पं. जिवती.