समाज मंडळाने केला अंत्यविधीचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:54 IST2021-03-04T04:54:17+5:302021-03-04T04:54:17+5:30

: वृद्धापकाळाने निधन झालेल्या गरीब महिलेच्या अंत्यविधीचा संपूर्ण खर्च पद्मशाली समाज मंडळ भद्रावतीने उचलून ...

The cost of the funeral was borne by the Samaj Mandal | समाज मंडळाने केला अंत्यविधीचा खर्च

समाज मंडळाने केला अंत्यविधीचा खर्च

: वृद्धापकाळाने निधन झालेल्या गरीब महिलेच्या अंत्यविधीचा संपूर्ण खर्च पद्मशाली समाज मंडळ भद्रावतीने उचलून माणुसकीचा परिचय दिला व एक आदर्श प्रस्थापित केला.

मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक सुरेश परसावर यांच्या पुढाकाराने अंतिम संस्काराचे महत्त्वपूर्ण कार्य योग्यरीत्या पार पडले.

भद्रावती येथील पुष्पा गणपतराव वासलवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मुलीच्या आश्रयाने जीवन व्यतीत करणाऱ्या वृद्धेची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती. ज्या मुलीच्या आश्रयाने ती जीवन जगत होती तिचीही आर्थिक स्थिती नाजुक आहे. ही बाब कळताच पद्मशाली समाज मंडळ भद्रावतीचे अध्यक्ष प्रा. सुरेश परसावार यांनी पुढाकाराने घेत अंतिम संस्काराचा पूर्ण खर्च समाज मंडळाने करण्याचा निर्णय घेतला. याप्रसंगी पद्मशाली मंडळाचे सचिव नागेश कानपिल्लीवार, उपाध्यक्ष नरेंद्र बल्लेवार, कोषाध्यक्ष विजय तुम्मे, माजी सचिव गजानन जायपत्रीवार, वामन मेनेवार, शामराव वासलवार. वसंत यंगलवार उपस्थित होते.

Web Title: The cost of the funeral was borne by the Samaj Mandal