नगरसेविका जयश्री मोहूर्ले यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:19 IST2021-06-21T04:19:51+5:302021-06-21T04:19:51+5:30

बल्लारपूर : जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मुंबई व रक्तकेंद्र सामान्य रुग्णालय ...

Corporator Jayashree Mohurle felicitated | नगरसेविका जयश्री मोहूर्ले यांचा सत्कार

नगरसेविका जयश्री मोहूर्ले यांचा सत्कार

बल्लारपूर : जागतिक रक्तदान दिनाच्या निमित्ताने राज्य रक्त संक्रमण परिषद महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग मुंबई व रक्तकेंद्र सामान्य रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदाते व रक्तदान शिबिर आयोजक संस्थाच्या वतीने बल्लारपूर येथील नगरसेविका जयश्री किशोर मोहूर्ले यांचा सत्कार चंद्रपूर येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह येथे पार पडला.

कोरोना काळात मोठ्या प्रमाणावर रक्ताची कमतरता संपूर्ण देशभर जाणवत आहे. अशा परिस्थितीत नगरसेविका जयश्री मोहूर्ले यांनी ‘वाॅर्ड माझा, प्रयत्न माझा’ या उपक्रमातून ३० मार्च २०२० ला महाराणा प्रताप वॉर्ड,बल्लारपूर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले. त्यात रक्तदात्यांनी भरमसाठ योगदान दिले. जयश्री किशोर मोहूर्ले यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

===Photopath===

200621\img-20210620-wa0018.jpg

===Caption===

नगरसेविका जयश्री मोहूर्ले यांचा सत्कार

Web Title: Corporator Jayashree Mohurle felicitated