नगरसेवक प्रशांत दानवविरुध्द गुन्हा दाखल

By Admin | Updated: November 3, 2014 23:22 IST2014-11-03T23:22:35+5:302014-11-03T23:22:35+5:30

चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत दानव यांनी विभागीय आयुक्तांची व पर्यायी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात कलम भादंविच्या ४२०, ४६८, ४०१ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Corporator filed a complaint against Prashant Danav | नगरसेवक प्रशांत दानवविरुध्द गुन्हा दाखल

नगरसेवक प्रशांत दानवविरुध्द गुन्हा दाखल

चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रशांत दानव यांनी विभागीय आयुक्तांची व पर्यायी शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात कलम भादंविच्या ४२०, ४६८, ४०१ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यामुळे मनपाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
महानगरपालिकेतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीचे गटनेता संतोष लहामगे यांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. संतोष लहामगे हे चंद्रपूर महानगरपालिकेत ३८ सदस्य संख्या असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस लोकशाही आघाडीचे गटनेते आहेत. विभागीय आयुक्त नागपूर यांचीही त्यांना मान्यता आहे. दरम्यान, नगरसेवक प्रशांत दानव यांनी आघाडीचा गटनेता बदलासंबंधीचा कोणताही ठराव झाला नसताना काही सदस्यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून तसा बनावट प्रस्ताव आयुक्त, नागपूर यांच्याकडे सादर केला. हा खोटा प्रस्ताव सादर करून दानव यांनी महानगरपालिका व प्रशासनाची फसवणूक केली. त्यामुळे प्रशासन अडचणीत आले, असे लहामगे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर लहामगे यांनी ही तक्रार आयुक्त, नागपूर यांच्याकडेही केली व संबंधित शपथपत्रही सादर केले. या शपथपत्रानंतर आयुक्त नागपूर यांनी या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत संतोष लहामगे हेच गटनेता राहतील, असे एका पत्राद्वारे महानगरपालिकेला कळविले आहे. दरम्यान, याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी नगरसेवक प्रशांत दानव यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Corporator filed a complaint against Prashant Danav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.