मनपाचे कोविड रुग्णालय ठरणार रुग्णांसाठी ‘आसरा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:29 IST2021-05-19T04:29:59+5:302021-05-19T04:29:59+5:30
यावेळी अध्यक्षस्थानी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, तर प्रमुख पाहुणे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आभासी पद्धतीने सहभागी झाले. कार्यक्रमाप्रसंगी खासदार बाळू धानोरकर, ...

मनपाचे कोविड रुग्णालय ठरणार रुग्णांसाठी ‘आसरा’
यावेळी अध्यक्षस्थानी पालकमंत्री विजय वडेट्टीवार, तर प्रमुख पाहुणे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आभासी पद्धतीने सहभागी झाले. कार्यक्रमाप्रसंगी खासदार बाळू धानोरकर, महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवि आसवानी, आयुक्त राजेश मोहिते, संदीप आवारी, गटनेता सुरेश पचारे, डॉ.सुरेश महाकुलकर, नगरसेवक अनिल फुलझेले, संजय कंचर्लावार, सुभाष कासनगोटुवार, विनोद दत्तात्रेय आदी उपस्थित होते.
आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर मनपाचे कार्य नेहमीच उत्तम राहिले. अमृत योजनेचे काम प्रशंसनीय आहे. पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, कोरोना रुग्णाची संख्या कमी होत असली, तरी येणारी तिसरी लाट भयंकर असू शकते. त्यासाठी मनपाचे रुग्णालय फायदेशीर ठरणार आहे. महापौर राखी कंचर्लावार यांनी हॉस्पिटलमध्ये सर्व सोयी उपलब्ध असून, रुग्णांची गैरसोय होणार नाही, असा विश्वास दिला. मनपाने जागा हस्तांतरित करून मोठे हॉस्पिटल उभारण्याची सूचना खासदार बाळू धानोरकर यांनी केली. प्रास्ताविक आयुक्त राजेश मोहिते तर संचालन बबिता उईके यांनी केले. यावेळी उपायुक्त विशाल वाघ, उपायुक्त अशोक गराटे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.आविष्कार खंडारे व सर्व आमदार, नगरसेवक, अधिकारी वर्ग आभासी पद्धतीने उपस्थित होते.