चंद्रपुरात मनपाची धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:01 IST2020-04-24T05:00:00+5:302020-04-24T05:01:17+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरिकांना घरातच राहण्याचे वारंवार आवाहन करीत आहे. चंद्रपूर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही नागरिक विनाकरण रस्त्यावर फिरत असल्याने कोरोनाच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. अशा नागरिकांवर पोलीस कारवाईही केली जात आहे. मात्र, तरीही घराबाहेर पडण्याचे नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही.

Corporation's Dhadak campaign in Chandrapur | चंद्रपुरात मनपाची धडक मोहीम

चंद्रपुरात मनपाची धडक मोहीम

ठळक मुद्देएकाच दिवशी १२४ लोकांवर कारवाई : २४ हजार ८०० रुपये दंड वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनापासून बचावासाठी मास्क घालणे आवश्यक आहे. मास्कशिवाय घराबाहेर पडण्यास सरकारने बंदी घातली आहे. सरकारच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त राजेश मोहिते यांनी यासंबंधीचे निर्देश दिले असून त्यानुसार चंद्रपुरात मास्क न लावता रस्त्यावर फिरणाऱ्यांकडून २०० रुपये दंड आकारण्याची कारवाई सुरु करण्यात आली आहे. महापालिकेच्या पथकांनी बुधवारी व गुरुवारी शहरात मास्कशिवाय फिरणाऱ्या १२४ नागरिकांवर कारवाई करीत २४ हजार ८०० रूपयांचा दंड वसूल केला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार नागरिकांना घरातच राहण्याचे वारंवार आवाहन करीत आहे. चंद्रपूर शहरात प्रशासकीय स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, काही नागरिक विनाकरण रस्त्यावर फिरत असल्याने कोरोनाच्या प्रादुर्भावाची शक्यता आहे. अशा नागरिकांवर पोलीस कारवाईही केली जात आहे. मात्र, तरीही घराबाहेर पडण्याचे नागरिकांचे प्रमाण कमी झालेले नाही. त्यामुळे आता राज्य सरकारने पूर्वपरवानगी घेऊन घराबाहेर पडणाऱ्यांनाही मास्क लावणे सक्तीचे केले आहे.
त्यानुसार आता चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरात मास्कशिवाय फिरणाºयांना २०० रुपये दंड लावण्याची कारवाई सुरु केलेली आहे.
याची अंमलबजावणी महानगरपालिकेने सुरू केली आहे. प्रत्येकी २०० रूपयांप्रमाणे बुधवारी ४२ नागरिकांवर कारवाई करून आठ हजार ४०० रुपये दंड व गुरुवारी ८२ नागरिकांवर कारवाई करून १६ हजार ४०० रूपयांचा दंड असे दोन दिवसात एकूण १२४ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. यात एकूण २४ हजार ८०० रुपयांचा दंड पथकांनी वसूल केला आहे. ही कारवाई अशीच सुरू राहणार आहे.

झोननिहाय कारवाई
झोननिहाय कारवाईदरम्यान झोन क्र.१ अंतर्गत ४१ लोकांवर कारवाई करून ८२०० रुपये दंड, झोन क्र. २ अंतर्गत ४२ लोकांवर कारवाई करून ८४०० रुपये दंड, झोन क्र. ३ अंतर्गत ४१ लोकांवर कारवाई करून ८२०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय मास्क न घातलेल्या व्यावसायिकांवरही कारवाई करण्यात येत आहे. कारवाईदरम्यान मास्क लावण्याची समज देण्यात येऊन प्रत्येक नागरिकाला ३ मॉस्कसुद्धा देण्यात आले.

गडचांदुरात तीन दिवसात ८४५ जणांवर कारवाई
गडचांदूर नगर परिषदेच्या वतीने तीन दिवसात ८४५ नागरिकांवर मास्क न लावता फिरत असताना कारवाई केली. प्रत्येकी २०० रुपये दंड वसूल केला. सदर कारवाई नगर परिषदेच्या अध्यक्ष सविता टेकाम, उपाध्यक्ष शरद जोगी, मुख्याधिकारी डॉ. विशाखा शेळकी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक स्वप्नील पिदूरकर, स्वच्छता निरीक्षक प्रमोद वाघमारे, संतोष गोरे, संतोष करदोडे, साहील कुलसंगे, सचिन खनके यांनी केली.

प्रभागनिहाय तीन पथके
सहायक आयुक्त सचिन पाटील, शितल वाकडे, धनंजय सरनाईक यांच्या नेतृत्वात तीनही झोनच्या स्वच्छता निरीक्षकांद्वारेही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी प्रत्येक प्रभागात एक असे तीन पथक तैनात केले आहेत. दंड करण्याची कारवाई सातत्याने सुरु राहणार असून आपल्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी मॉस्क लावून ठेवण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेने केले आहे.

Web Title: Corporation's Dhadak campaign in Chandrapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.