कोरपना तालुका हागणदारीमुक्त

By Admin | Updated: March 20, 2017 00:29 IST2017-03-20T00:29:52+5:302017-03-20T00:29:52+5:30

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोरपना तालुका हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे.

Corpana Talukka is free from the hawks | कोरपना तालुका हागणदारीमुक्त

कोरपना तालुका हागणदारीमुक्त

विदर्भातील पहिला पेसा तालुका : सात तालुके हागणदारीमुक्त
चंद्रपूर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत कोरपना तालुका हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्यात आला आहे. पेसा कायद्याअंतर्गत येणारा कोरपना हा विदर्भातील पहिला तर जिल्ह्यातील सातवा हागणदारीमुक्त तालुका तालुका ठरला आहे.
जिल्ह्यात राजुरा, जिवती, कोरपना असे तीन तालुके पेसा कायद्यात समाविष्ट आहेत. यात कोरपना तालुक्याने बाजी मारली आहे.
समितीचे गटविकास अधिकारी संदिप घोनसिकर यांना मिळाला आहे.
कोरपना तालुक्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अनेक विकास कामांना गती मिळाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील खिरडी व रूपापेठ ही दोन गावे दत्तक घेतली. पिंपळगाव येथील महिलांना ब्रॅडअम्बेसेडर म्हणुन निवड करुन गावागावात गृहभेटी देऊन प्रत्येकाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे काम करण्यात आले. याचाच परिणाम म्हणून तालुका हागणदारी मुक्त करण्यास यश आले आहे.
नुकतेच खिरडी गावात सभा घेवून गावकऱ्यांच्या उपस्थितीत व उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मोहिते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत राजेश राठोड, गटविकास अधिकारी संदिप घोनसिकर यांनी हागणदारी मुक्त तालुका करण्यात आल्याची घोषणा केली व हागणदारी मुक्त तालुकाचा प्रस्ताव बहाल करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाला स्वच्छ भारत मिशनचे कृष्णकांत खानझोडे, साजिद निजामी, सहाय्यक गटविकास अधिकारी धंनजय साळवे ,विस्तार अधिकारी प्रविण मस्के, जीवन प्रधान, शेख, रवि लाटेलवार, लारेन्स खोबरागडे, सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व खिरडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Corpana Talukka is free from the hawks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.