कोरोनाची दहशत संपेना ११३५ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:28 IST2021-04-17T04:28:19+5:302021-04-17T04:28:19+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ३९ हजार ५४ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २९ हजार ५५४ ...

कोरोनाची दहशत संपेना ११३५ पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ३९ हजार ५४ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २९ हजार ५५४ झाली आहे. सध्या ८९४८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ३ लाख २० हजार ३६७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख ७४ हजार ९८६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे. मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
असे आहेत मृतक
आज मृत झालेल्यामध्ये घुग्गुस येथील ६६ वर्षीय पुरूष, राजोली मुल येथील ५३ वर्षीय पुरूष, विकास नगर वरोरा येथील ८६ वर्षीय पुरूष, दडमल वार्ड चंद्रपूर येथील ५९ वर्षीय पुरूष, नगीना बाग येथील ४३ वर्षीय महिला, गजानन महाराज चौक येथील ४७ वर्षीय पुरूष, न्यू पटोले नगर येथील ६५ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५५२ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ५०५, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २१, यवतमाळ २०, भंडारा एक, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
तालुकानिहाय ४६४ रूग्ण
आज बाधित आलेल्या ११३५ रूग्णांमध्ये चंद्रपूर पालिका क्षेत्रातील ४६३, चंद्रपूर तालूका ५८, बल्लारपूर ८१, भद्रावती १०७, ब्रह्मपुरी ११८, नागभीड ३७, सिंदेवाही सात, मूल २६, सावली चार, पोंभूर्णा तीन, गोंडपिपरी सहा, राजूरा २५, चिमूर चार, वरोरा १५५, कोरपना १५, जिवती ११ व इतर ठिकाणच्या १५ रूग्णांचा समावेश आहे.