कोरोनाचा कहर सोबतच चंद्रपूरचा पाराही ४३.२ अंशावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:29 IST2021-04-01T04:29:26+5:302021-04-01T04:29:26+5:30
नागपूर रिजनल मेट्रालॉजी (आरएमसी) ने नोंदविलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि चंद्रपूर परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. बंगाल ...

कोरोनाचा कहर सोबतच चंद्रपूरचा पाराही ४३.२ अंशावर!
नागपूर रिजनल मेट्रालॉजी (आरएमसी) ने नोंदविलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र आणि चंद्रपूर परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. बंगाल उपसागराच्या आग्नेय भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती असल्याचे कळविण्यात आले. बंगालचा उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्र या भागात येत्या तीन-चार दिवसात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्ह्यात सलग तीन आठवड्यापासून वातावरणात प्रचंड उकाडा आहे. मागील आठवड्यापासून चंद्रपूर व ब्रह्मपुरी शहराच्या तापमानात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी चंद्रपूर शहराचे कमाल तापमान ४३.२ तर किमान २०.४ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. रिजनल मेट्रालॉजी नागपूर केंद्राच्या संकेतस्थळावर आज ब्रह्मपुरी शहराच्या कमाल तापमानाची नोंद उपलब्ध नाही. या केंद्रातंर्गत येणाऱ्या ११ शहरांमध्ये मंगळवारी ब्रह्मपुरीचे तापमान सर्वाधिक ४३.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते.
बाहेर निघताना जपून
कोरडे हवामान असल्याने सुर्याची किरणे थेट जमिनीवर पडत आहेत. परिणामी उन्हाचा चटका वाढत असून सकाळी ११ वाजतापासूनच अंगाची लाहीलाही होत आहे. यापुढेही उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार आहेत. त्यामुळे जरा जपूनच बाहेर निघावे लागणार आहे.