Corona's fourth victim in the district | जिल्ह्यात कोरोनाचा चवथा बळी

जिल्ह्यात कोरोनाचा चवथा बळी

ठळक मुद्देनवे २३ बाधित : एकूण रुग्णसंख्या पोहचली ८५६ वर

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासात २३ बाधितांची भर पडली आहे. तसेच एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंत बाधितांची संख्या ८५६ झाली आहे. आतापर्यंत ४७५ बाधित बरे झाले आहेत. तर ३७५ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात रविवारी मृत्यूमुखी पडलेली महिला ही एमआयडीसी परिसरातील असून रात्री १.३० वाजता या महिलेचा मृत्यू झाला आहे.
रविवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये तुकूम पोलीस लाईन येथील संपर्कातून बाधित झालेल्यांची संख्या तीन आहे. याशिवाय पोलीस लाईन तुकुम येथीलच एक २२ वर्षीय युवक पॉझिटिव्ह आला आहे.
दत्तनगर नागपूर रोड सिव्हील लाईन येथील दोन पुरुष संपर्कातून पॉझिटिव्ह आले आहे. एकता चौक दुगार्पुर येथील १५ वर्षीय मुलगी पॉझिटिव्ह ठरली आहे. लालपेठ कॉलनी चंद्रपूर येथीलदोन पुरुष पॉझिटिव्ह ठरले आहे. हिंदुस्तान कॉलनी लालपेठ वॉर्ड येथील ३० पुरुष व ४४ वर्षीय महिला संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे. पोलीस लाईन येथील १५ वर्षीय मुलगी संपर्कातून पॉझिटिव्ह ठरली आहे. जटपुरा गेट येथील ३८ वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे. रामनगर शुभमंगल कार्यालयाजवळील २७ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह ठरला आहे. पोलीस लाईन तुकूम येथील ५५ वर्षीय पुरुष, बंगाली कॅम्प येथील २१ वर्षीय व ५८ वर्षीय पुरुष पॉझिटीव्ह ठरले आहे. याशिवाय चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झालेली ३० वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे.
याशिवाय जिल्ह्यातील वाडेगाव येथील पुरुष, घुग्घुस वस्तीतील एक खासगी डॉक्टर आणि ब्रह्मपुरी तालुक्यातील भांडेगाव येथील २५ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह ठरला आहे. असे आजचे एकूण २३ पॉझिटिव्ह पकडून ८५६ बाधित आतापर्यंत पुढे आले आहे.
जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत कोरोना लागन झाल्यामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या एकूण सहा आहे. यामध्ये चार रुग्ण हे चंद्रपूर जिल्ह्यातील आहे. तर अन्य दोन चंद्रपूर येथे वैद्यकीय उपचार घेताना मृत्युमुखी पडले. अन्य ठिकाणच्या दोन मृत्यूमध्ये तेलंगना व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी एका बाधिताचा समावेश आहे. एक महिला तेलंगणा येथील होती. तर दुसरा ६० वर्षीय कामगार हा बुलडाणा येथील होता.
बल्लारपूर येथे काझीपेठ एक्सप्रेसने आला होता. त्यामुळे त्यांची नोंद जिल्ह्यात घेण्यात आली नाही.
जिल्ह्यात रविवारी मृत्युमुखी पडलेली महिला ही एमआयडीसी परिसरातील असून रात्री दीड वाजता या महिलेचा मृत्यू झाला आहे.
 

Web Title: Corona's fourth victim in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.