खैरे कुणबी समाजातर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:25 IST2021-02-08T04:25:13+5:302021-02-08T04:25:13+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : कोरोना महामारीच्या काळात देशभरात लॉकडाऊन होते, कोरोनाच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडत नव्हते. यावेळी आरोग्य ...

Corona Warriors felicitated by Khaire Kunbi Samaj | खैरे कुणबी समाजातर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

खैरे कुणबी समाजातर्फे कोरोना योद्ध्यांचा सत्कार

लोकमत न्यूज नेटवर्क

बल्लारपूर : कोरोना महामारीच्या काळात देशभरात लॉकडाऊन होते, कोरोनाच्या भीतीने नागरिक घराबाहेर पडत नव्हते. यावेळी आरोग्य यंत्रणेने जीवाची पर्वा न करता महत्त्वाची भूमिका पार पाडताना रुग्णांना सेवा दिली. या कोरोना योद्ध्यांचा खैरे कुणबी समाजाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

१०८ रुग्णवाहिका जिल्हा व्यवस्थापक डॉ. चेतन खुशाल कोरडे व बल्लारपूरचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अतुल पुरुषोत्तम कोहपरे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा मार्गदर्शक वसंत खेडेेकर, अध्यक्ष सुधीर कोरडे, उपाध्यक्ष राजेश बट्टे, ईशा कोरडे, सचिव राजेश खेडेकर, सदस्य रंजित धोटे, उत्तम तेलंग, शरद ठाकरे, राहुल मुळे, उमेश काकडे, सचिन पंडित तसेच संस्थेचे सल्लागार शामराव कुबडे, मुरलीधर भाकरे, खुशाल कोरडे, प्रा. चंद्रशेखर नागापुरे आदी समाजबांधव उपस्थित होते.

Web Title: Corona Warriors felicitated by Khaire Kunbi Samaj