कल्पतरु परिवारातर्फे कोरोना योद्धांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:24 IST2020-12-23T04:24:56+5:302020-12-23T04:24:56+5:30

सिंदेवाही : कोरोना महामारीत विशेष कार्य करणाऱ्या कोरोना योद्धांचा कल्पतरु परिवारातर्फे स्थानिक कल्पतरू विद्यामंदिरात आयोजित कार्यक्रमात पार पडला. यावेळी ...

Corona Warriors felicitated by Kalpataru family | कल्पतरु परिवारातर्फे कोरोना योद्धांचा सत्कार

कल्पतरु परिवारातर्फे कोरोना योद्धांचा सत्कार

सिंदेवाही : कोरोना महामारीत विशेष कार्य करणाऱ्या कोरोना योद्धांचा कल्पतरु परिवारातर्फे स्थानिक कल्पतरू विद्यामंदिरात आयोजित कार्यक्रमात पार पडला. यावेळी राकेश तुंडूलवार, लता ताडाम यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंगकर्मी प्रा. शेखर डोंगरे तर प्रमुख पाहुणे म्हणून कल्पतरुचे संस्थापक धनंजय बन्सोड आदी उपस्थित होते. जगाला हादरवून सोडणाऱ्या कोरोना महामारीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवाकार्य करणाऱ्या कोरोना योद्धांचे कार्य गौरवास्पद आहे. या उद्देशाने येथील तालुका आरोग्य केंद्रात कोरोना योद्धा म्हणून कार्य करणाऱ्या राकेश तुंडूलवार, लता ताडाम यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कल्पतरू पतसंस्था, विद्यामंदिर व कल्पवृक्ष पतसंस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालन बंडू कोठेवार तर आभार दिलीप नाडमवार यांनी मानले.

Web Title: Corona Warriors felicitated by Kalpataru family