कोरोना बाधितांनाही करता येणार ग्रामपंचायतमध्ये मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:12 IST2021-01-13T05:12:24+5:302021-01-13T05:12:24+5:30

मतदानासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक आहे. त्यामुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक उमेदवार आपले ...

Corona victims can also vote in the Gram Panchayat | कोरोना बाधितांनाही करता येणार ग्रामपंचायतमध्ये मतदान

कोरोना बाधितांनाही करता येणार ग्रामपंचायतमध्ये मतदान

मतदानासाठी आता अवघे दोन दिवस शिल्लक आहे. त्यामुळे गावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. प्रत्येक उमेदवार आपले गणित जुळवित आहे. यात मात्र कोरोना बाधितांमुळे उमेदवारांची चिंता वाढली होती. ही चिंताही प्रशासनाने दूर केली असून कोरोना बाधितांनाही मतदानाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये मतदान करता येणार आहे. यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांना पीपीटी किट पुरविण्यात येणार असून सॅनिटायझर तसेच इतर सर्व सुरक्षा साधनांचा वापर केला जाणार आहे. कोरोनाबाधितांना मतदानासाठी ठरवून दिलेल्या वेळेतच मतदान करावे लागणार आहे. अन्य मतदारांच्या रांगेमध्ये त्यांना उभे राहता येणार नाही.

जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची आकडेवारी

क्वारंटाईन ५२ सर्वाधिक

१८ वर्षावरील ३८ क्वारंटाईन

उपचार सुरु ३४७

एकूण पाॅझिटिव्ह

२२७१८

जिल्ह्यात एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या

२१९९४

सॅनिटायझरची राहणार व्यवस्था

ग्रामपंचायत निवडणुकीतमध्ये मतदान करणाऱ्या मतदारांना कोरोनाबाधितांमुळे संसर्ग होऊ नये यासाठी काळजी घेतल्या जाणार आहे. मतदान केंद्रावर सॅनिटायझरची व्यवस्था केली जाणार आहे. कोरोना संसर्ग नसलेल्या मतदारांचे मतदान झाल्यानंतर बाघित मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. या वेळेत कोरोनाबाधितांना मतदान करण्याची संधी दिली जाणार आहे.

नावाची पडताळणी

मतदान केंद्रात येणाऱ्या प्रत्येकांना मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची ओळख पटविण्यासाठी आरोग्य विभागातील बाधितांच्या यादीतील नाव आणि ओळखपत्राची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर कोरोना बाधितालाही मतदान करता येणार आहे.

---

वेळ राहणार राखीव

१५ जानेवारी रोजी जिल्ह्यात ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यात कोरोनाबाधितांना मतदान करता यावे यासाठी शेवटच्या तासामध्ये कोरोनाबाधित रुग्णांना मतदान करता येणार आहे. ही वेळ त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. ही प्रक्रिया साधारणत: अर्धा तास राहणार आहे. या काळात मतदान केंद्रावर सर्वच कर्मचारी पीपीई कीटमध्ये आपली जबाबदारी पार पाडणार आहे.

---

बाॅक्स

विधान परिषदेसाठी ज्या पद्धतीने मतदान घेण्यात आले. त्याच पद्धतीने यावेळीही मतदान घेण्यात येेणार आहे. कोरोनाबाधितांना शेवटच्या तासामध्ये मतदान करता येणार आहे. यासाठी मतदान केंद्रातील कर्मचारी सर्व नियमांना पाळून सुरक्षितता बाळगणार आहे. मतदान करण्यापूर्वी कोरोना बाधित असलेल्यांना सॅनिटायझर तसेच इतर सुरक्षात्मक साधनांचा वापर करण्यात येणार आहे.

Web Title: Corona victims can also vote in the Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.