सिंदेवाहीत व्यावसायिकांना कोरोना चाचणी बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:26 IST2021-03-19T04:26:59+5:302021-03-19T04:26:59+5:30
सिंदेवाही : शहर व तालुक्यातील व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ती त्यांनी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले. ...

सिंदेवाहीत व्यावसायिकांना कोरोना चाचणी बंधनकारक
सिंदेवाही : शहर व तालुक्यातील व्यावसायिकांनी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ती त्यांनी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले.
सिंदेवाही तालुक्यातील व शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, पान चालक, कंत्राटदार हेअर सलून व ब्युटी पार्लर, ऑटोरिक्षा चालक, भाजीविक्रेते या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व व्यावसायिकांना चाचणी बंधनकारक आहे. ही चाचणी नि:शुल्क आहे. चाचणीसाठी आधार कार्डची आवश्यकता आहे. व्यावसायिकांना चाचणी केल्याबाबतचे प्रमाणपत्र आपल्या दुकानात आस्थापनेत ठेवणेही बंधनकारक आहे. जे व्यावसायिक व विक्रेते चाचणी करणार नाही, त्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच दुकान व आस्थापना सुरु करण्यास मज्जाव केला जाईल. चाचणीसाठी मदत लागल्यास सिंदेवाही आरोग्य विभाग, तहसील व नगरपंचायतशी संपर्क साधावा. असे आवाहन तहसीलदार गणेश जगदाळे, नगरपंचायतच्या मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड यांनी केले आहे.