चिमूरमध्ये होणार कोरोना चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 05:00 IST2020-07-22T05:00:00+5:302020-07-22T05:00:51+5:30
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात कोरोना रूग्ण आढळले आहे. दिवसेंदिवस या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामूळे जिल्ह्यात निदान व उपचार अती जलद गतीने वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणुन चिमूर येथील कोविड सेंटरमध्ये अॅन्टिजेन टेस्टिंग सुविधा उपलब्ध करुण देण्यात आली आहे. केद्राचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल यांच्या हस्ते करण्यात आले.

चिमूरमध्ये होणार कोरोना चाचणी
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर : राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. अशा स्थितीत त्वरित निदान व उपचार होणे गरजेचे आहे. याकरिता जिल्ह्यात चाचणी केंद्राचे प्रमाण वाढविल्या जात आहे. याच अनुषंगाने चिमूर येथील कोविड मदत केंद्रात अॅॅन्टिजेन टेस्टिंग केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे आता येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात कोरोना रूग्ण आढळले आहे. दिवसेंदिवस या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामूळे जिल्ह्यात निदान व उपचार अती जलद गतीने वाढविण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. याचाच एक भाग म्हणुन चिमूर येथील कोविड सेंटरमध्ये अॅन्टिजेन टेस्टिंग सुविधा उपलब्ध करुण देण्यात आली आहे. केद्राचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार संजय नागटिळक, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधीक्षक डॉ. गो. वा. भगत, डॉ. दिगांबर मेश्राम तथा तंत्रज्ञ उपस्थित होते.
सध्या स्थितीत केंद्रात ३५ टेस्ट कीट उपलब्ध असुन प्रतिबंधित क्षेत्रातील तसेच इतरही सर्दी, ताप व खोकल्याच्या रुग्णांची तपासणी येथे केली जाणार आहे. उद्घाटनानंतर अवघ्या काही वेळेत ९ जणांची तपासणी करण्यात आली. या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची माहिती वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिली. जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा ३०० च्या वर गेला आहे. त्यामुळे प्रत्येक तालुकाप्रशासन सतर्क झाले असून अधिकाधिक चाचणी करण्याचे नियोजन केले आहे.
तालुक्यात एक रुग्ण
चिमूर तालुक्यात आजपर्यंत ५ हजार ६३२ जणांना संस्थात्मत विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले. सध्या स्थितीत केवळ ४१ जण संस्थात्मक विलगीकरण केंद्रात आहेत. तालुक्यात सोनेगाव (वन)व नेरी येथील प्रत्येकी एक असे दोन रुग्ण आढळले. त्यापैकी सोनेगाव वन येथील रुग्ण बरा होऊन घरी गेला. त्यामुळे सध्यास्थितीत चिमूर तालुक्यात एकच अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
चिमूर येथील कोविड मदत केंद्रात कोरोना तपासणी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. सर्दी, खोकला किंवा ताप या पैकी कोणतेही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी या केंद्रात येऊन तपासणी करावी. अवघ्या अर्ध्या तासाच रिपोर्ट प्राप्त करूण आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे .
- प्र्रकाश संकपाळ,
उपविभागीय अधिकारी, चिमूर