कोरोना ‘सुपर स्प्रेडर’ ची आठवड्यातून दोनदा तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:00 IST2021-03-13T05:00:00+5:302021-03-13T05:00:42+5:30

शुक्रवारपासून शहरात कोरोना चाचणीचे सहा केंद्र सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत १४ हजार ८०४ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामध्ये ५३५ रूग्ण अ‍ॅक्टिव आहेत. चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्र अंतर्गत ९ हजार ६७५ रूग्णांची नोंद झाली असून २३९ रूग्ण अ‍ॅक्टिव आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील एकूण बाधित मृतकांपैकी १९० मृतकांची नोंद चंद्रपुरात झाली.

Corona ‘Super Spreader’ checked twice a week | कोरोना ‘सुपर स्प्रेडर’ ची आठवड्यातून दोनदा तपासणी

कोरोना ‘सुपर स्प्रेडर’ ची आठवड्यातून दोनदा तपासणी

ठळक मुद्देचंद्रपुरात धक्कादायक रूग्णवाढ : मनपा आरोग्य विभागाचे कठोर पाऊल

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना प्रतिबंधक मोहिमेसोबतच नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मास्क लावणे, अंतर पाळणे व गर्दीच्या ठिकाणी जाणे ही साधी त्रिसुत्री पाळण्यासही नागरिक बेजबाबदारपणा दाखवत आहेत. 
चंद्रपुरात कोरोना रूग्णांची दररोज धक्कादायी वाढत होत असल्याने महानगर पालिका प्रशासनाने कोरोना कोरोना ‘सुपर स्प्रेडर’ची आठवड्यातून दोनदा तपासणी करण्याचे कठोर पाऊल उचलले. शुक्रवारपासून तपासणी मोहीम सुरू करण्यात आली.
व्यापारी संघटनांची बैठक
मनपाने शहरातील व्यापारी संघटनांची तातडीची बैठक घेतली. यावेळी आयुक्त राजेश मोहिते, उपायुक्त विशाल वाघ, सहाय्यक आयुक्त धनंजय सरनाईक, विद्या पाटील, शितल पाटील, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे, चेंबर आफ कॉमर्सचे अध्यक्ष हर्षवर्धन सिंघवी, विनोद बजाज, सदानंद खत्री, सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र लोढा, रेस्टॉरेन्टचे अशोक हासानी, राजू सलूजा, अविनाश रेभनकर, सुधाकर धकाते, किराणा व्यापारी संघटनेचे सुनिल हासानी, बळीराम शिंदे, संजय पावडे व अन्य उपस्थित होते.

चंद्रपूर शहरात कोरोना चाचणीचे सहा केंद्र
शुक्रवारपासून शहरात कोरोना चाचणीचे सहा केंद्र सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत १४ हजार ८०४ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामध्ये ५३५ रूग्ण अ‍ॅक्टिव आहेत. चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्र अंतर्गत ९ हजार ६७५ रूग्णांची नोंद झाली असून २३९ रूग्ण अ‍ॅक्टिव आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यातील एकूण बाधित मृतकांपैकी १९० मृतकांची नोंद चंद्रपुरात झाली. दरदिवशी रूग्णांची संख्या वाढत असतानाही नागरिक यापासून धडा घेत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे कोरोना ‘सुपर स्प्रेडर’ची आठवड्यातून दोनदा तपासणी करण्याचे पाऊल महानगर पालिका आरोग्य विभागाने उचलले. मोहिमेला सुरूवातही करण्यात आली. 

कोण आहेत चंद्रपुरातील कोरोना सुपर स्प्रेडर ?
चंद्रपुरातील ऑटोचालक, भाजी विक्रेता, हातठेला चालक, किराणा दुकानदार, कापड व्यावसायिक, मेडिकल स्टोअर्स चालक तसेच दैनंदिन गरजांच्या वस्तु विकणारे व या दुकानांमध्ये काम करणारे कर्मचारी, सतत नागरिकांच्या संपर्कात येणाऱ्या सर्वच दुकानदारांची कोरोना सुपर स्प्रेडर म्हणून मनपाने नोंद घेतली. या सर्वांनी दर १५ दिवसांतून कोरोना चाचणी करून घेण्याच्या मनपाने सूचना दिल्या.

 

Web Title: Corona ‘Super Spreader’ checked twice a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.