कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:26 IST2021-04-12T04:26:04+5:302021-04-12T04:26:04+5:30
मागील वर्षी कोविडसाठी आरक्षित करण्यात आलेल्या रुग्णालयांसह आणखी काही खासगी रुग्णालये कोविडकरिता आरक्षित करण्यात यावीत, रेमडेसिविर या इंजेक्शनचा काळाबाजार ...

कोरोना रुग्णांची गैरसोय होऊ नये
मागील वर्षी कोविडसाठी आरक्षित करण्यात आलेल्या रुग्णालयांसह आणखी काही खासगी रुग्णालये कोविडकरिता आरक्षित करण्यात यावीत, रेमडेसिविर या इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे, त्यावर रोख लावण्याकरिता उपाययोजना कराव्यात, कोविडकरिता आरक्षित करण्यात आलेल्या खासगी रुग्णालयांत बेड रिक्त असून गंभीर रुग्णांना रुग्णालयात दाखल केले जात नसल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा रुग्णालयातील व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्यात यावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आपल्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून दररोजची माहिती घेऊन त्यावर अंमलबजावणी करण्यात यावी, रुग्णालयात भरती असलेल्या कोविड रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन मिळत नसेल तर कारखान्यांना देण्यात येणारे ऑक्सिजन बंद करून पहिले रुग्णांना ऑक्सिजन देण्यात यावे, केवळ २० कोरोना रुग्णांना गृह विलगीकरण करण्याकरिता डॉक्टरांना परवानगी आहे. मात्र, रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता यात वाढ करण्यात यावी, आदी सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत.