कोरोना परतु लागताच गाव सोडले; कामासाठी पुन्हा मुंबई, पुणे गाठले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:19 IST2021-07-21T04:19:43+5:302021-07-21T04:19:43+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील एमआयडीसीमधील अनेक उद्योग बंद आहेत. त्यामुळे येथे बेरोजगारीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दरवर्षी येथील युवक कामाच्या ...

कोरोना परतु लागताच गाव सोडले; कामासाठी पुन्हा मुंबई, पुणे गाठले!
चंद्रपूर जिल्ह्यातील एमआयडीसीमधील अनेक उद्योग बंद आहेत. त्यामुळे येथे बेरोजगारीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे दरवर्षी येथील युवक कामाच्या शोधात परराज्यात किंवा मुंबई, पुणे, हैदराबाद, दिल्ली आदी मोठमोठ्या शहरात जात असतात; मात्र मार्च २०२० मध्ये कोरोना आढळून येताच सर्व कामगार, मजूर, युवक गावाकडे परत आले होते. यातील काहींनी गावाकडेच कामधंदा शोधला; मात्र ग्रामीण भागात रोजगारांचे साधन नसल्याने अनेकांनी पुन्हा शहराकडे धाव घेतली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील मजूर आंध्रप्रदेश, हैदराबाद आदी राज्यासह दिल्ली, मुंबई, पुणे, नाशिक आदी शहरात जाताना दिसून येत आहेत. कोरोनाने परदेशात जाणाऱ्यांची संख्या घटली आहे.
बॉक्स
मुले बाहेर असल्याने भरते धडकी
कोरोनामुळे मुलगा गावाला आला होता. दीड वर्ष घरीच होता; मात्र आता पुन्हा शहरात गेला आहे; परंतु तिसरी लाट येण्याचा धोका दररोज टीव्हीवर ऐकण्यास मिळतेा. त्यामुळे सतत चिंता लागून असते.
- अनसूयाबाई गेडाम
------
माझा मुलगा पुण्याला एका कंपनीत इंजिनिअर आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने घरी आला होता. सतत लॅपटॉपवर काम करायचा; परंतु आता पुन्हा पुण्याला गेला आहे. त्यामुळे भीती वाटते.
नम्रता रायपुरे
बॉक्स
परराज्यात किती जण गेले
हैदराबाद १२५
आंध्रप्रदेश ६५
मध्यप्रदेश ४०
तेलंगणा ४५
----
सर्वाधिक स्थलांतरण पुण्याकडे
पुणे २५०
मुंबई १९०
नागपूर २२५
दिल्ली ६०