व्यापारी मंडळातर्फे कोरोना तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:25 IST2021-03-14T04:25:48+5:302021-03-14T04:25:48+5:30

चंद्रपूर : शहर महानगरपालिका व चंद्रपूर व्यापारी मंडळातर्फे रेडिमेड असोसिएशनच्या सहकार्याने शहरातील व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी कोविड तपासणी शिबिराचे ...

Corona inspection camp by the Chamber of Commerce | व्यापारी मंडळातर्फे कोरोना तपासणी शिबिर

व्यापारी मंडळातर्फे कोरोना तपासणी शिबिर

चंद्रपूर : शहर महानगरपालिका व चंद्रपूर व्यापारी मंडळातर्फे रेडिमेड असोसिएशनच्या सहकार्याने शहरातील व्यापारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी कोविड तपासणी शिबिराचे आयोजन श्री लक्ष्मीनारायन मंदिर येथे करण्यात आले असून, हे शिबिर १५ दिवस चालणार आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. व्यापारी मंडळातर्फे प्रशासनाला सहकार्य करण्याच्या अनुषंगाने मनपा प्रशासनाच्या सहकार्याने कोरोना तपासणी शिबिर सुरू केले आहे. शुक्रवारी या शिबिराला सुरुवात करण्यात आली. शहरातील सर्व व्यापाऱ्यांना तपासणी अनिवार्य आहे. सर्वांनी तपासणी करण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रामजीवन परमार, सचिव प्रभाकर मंत्री, रेडिमेड असोसिएशनचे अध्यक्ष दिनेश बजाज, सचिव राकेश टहलियानी आदींनी केले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. आविष्कार खंडारे, सुमेध कोतपल्लीवार, संतोष चिल्लरवार, शिवन हासानी, मनीष बजाज, सचिन सालवे, मुन्ना चांडक, अहमद भाई, सत्यम् सोनी, सागर चिंतावार, राजू गमपावार आदी प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Corona inspection camp by the Chamber of Commerce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.