कोरोना वाढत असल्याने ब्रह्मपुरीत न.प.चे पथक तयार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:21 IST2021-02-20T05:21:55+5:302021-02-20T05:21:55+5:30

सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने कडक अंमलबजावणी करण्याचे धोरण पुन्हा अवलंबविले आहे. त्यानुसार ...

As Corona grows, NP's squad is formed in Brahmapuri | कोरोना वाढत असल्याने ब्रह्मपुरीत न.प.चे पथक तयार

कोरोना वाढत असल्याने ब्रह्मपुरीत न.प.चे पथक तयार

सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने कडक अंमलबजावणी करण्याचे धोरण पुन्हा अवलंबविले आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी तसे आदेश निर्गमित केले आहे. यामध्ये मास्क लावणे आवश्यक ठरले आहे. विना मास्क आढळल्यास ५०० रुपये दंड, सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास २०० रुपये दंड, दुकानदारासाठी एक हजार, दोन हजार रु. असा दंड आकारूनही जैसे थे परिस्थिती आढळल्यास तीन दिवसासाठी दुकान सील केले जाईल, असे आदेश मुख्याधिकारी यांनी निर्गमित केले आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. मात्र तालुक्यातील ग्रामीण भागात हे चित्र वेगळे आहे. ग्रामीण भागात मास्क नाही, अंतर नाही व अन्य कुठलाही मनात धाक नाही, अशी परिस्थिती आहे. अशावेळी त्यांच्यावरही निर्बंध घालणे आवश्यक ठरत आहे.

Web Title: As Corona grows, NP's squad is formed in Brahmapuri