ऐन होळीच्या दिवशी जिल्ह्यात कोरोनाचा भडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 05:00 IST2021-03-29T05:00:00+5:302021-03-29T05:00:36+5:30
जिल्ह्याने लाॅकडाऊन केला असून नागरिकांवर कठोर निर्बंध लादले आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातही रुग्णवाढीचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे किमान आतातरी नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. मध्यतरी रुग्णसंख्या अगदी कमी झाली होती. त्यामुळे कोरोना संकट गेले की काय, अशी अवस्था होती. मात्र आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ऐन होळीच्या दिवशी जिल्ह्यात कोरोनाचा भडका
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाची दुसरी लाट अधिक तीव्र होत असून रविवारी म्हणजे ऐन होळीच्या दिवशीच जिल्ह्यात कोरोनाचा भडका उडाला. तब्बल ३४१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर सलग दुसऱ्या दिवशीही जिल्ह्यात तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. शेजारी असलेल्या नागपूर, यवतमाळ तसेच वर्धा जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे या जिल्ह्याने लाॅकडाऊन केला असून नागरिकांवर कठोर निर्बंध लादले आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यातही रुग्णवाढीचा आकडा सातत्याने वाढत आहे. त्यामुळे किमान आतातरी नागरिकांनी सतर्क होणे गरजेचे आहे. मध्यतरी रुग्णसंख्या अगदी कमी झाली होती. त्यामुळे कोरोना संकट गेले की काय, अशी अवस्था होती. मात्र आता पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने किमान निर्बंध लावण्याची मागणी केली जात आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २७ हजार २६५ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ८१० झाली आहे.
चंद्रपूरची स्थिती चिंताजनक
चंद्रपूर मनपा हद्द व चंद्रपूर तालुक्यात दररोज आढळून येणारी रुग्णांची संख्या मोठी आहे. रविवारीदेखील चंद्रपूर मनपा हद्दीत ११३ तर तालुक्यात ३४ रुग्ण आढळले. त्यामुळे चंद्रपूरची स्थिती आता चिंताजनक होत चालली आहे.
ॲक्टिव्ह रुग्णसंख्या पोहचली २०३२ वर
मागील २४ तासात १६५ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर ३४१ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे. सध्यास्थितीत जिल्ह्यात २ हजार ३२ ॲक्टिव्ह रुग्णसंख्या झाली आहे.
वरोरापाठोपाठ राजुराही हॉटस्पॉटच्या दिशेने
आतापर्यंत वरोरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत होेते. आता राजुरा तालुक्यातही स्थिती चिंताजनक होत आहे. रविवारी वरोरा तालुक्यात ५० तर राजुरा तालुक्यात ३४ रुग्ण आढळले.