कोरोनाचा विस्फोट, रुग्णसंख्या २१५ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:25 IST2021-03-22T04:25:38+5:302021-03-22T04:25:38+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार ७३३ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ...

कोरोनाचा विस्फोट, रुग्णसंख्या २१५ वर
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २५ हजार ७३३ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २४ हजार ६६ झाली आहे. सध्या १२५७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, मागील काही दिवसांमध्ये रुग्णसंख्येच्या तुलनेमध्ये बरे होणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट जिल्ह्यात धोकादायक वळणावर आहे. रविवारी मृत झालेल्यांमध्ये बालाजी वाॅर्ड, चंद्रपूर येथील ६० वर्षीय पुरुष व ढुमने ले-आउट, गडचांदूर, येथील ७३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
आतापर्यंत दोन लाख ५० हजार ९१९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख १९ हजार ८२४ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ४१० बाधितांचे मृत्यू झाले आहेत. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३७१, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.
बाॅक्स
अशी आहे रुग्णसंख्या
चंद्रपूर पालिका क्षेत्र ८१
चंद्रपूर तालुका ०६
बल्लारपूर १८
भद्रावती १७
ब्रह्मपुरी ०२
नागभिड १७
सिंदेवाही ०२
मूल ०६
सावली ०५
गोडपिपरी ०२
राजुरा ०७
चिमूर ११
वरोरा २९
कोरपना ११
इतर०१
एकूण २१५
बाॅक्स
दृष्टिक्षेपात जिल्हा
रविवारचे कोरोना रुग्ण
२१५
एकूण बाधित
२५,७३३
ॲक्टिव्ह रुग्ण १२५७
एकूण बळी
४१०
रविवारी कोरोनामुक्त ९४