चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूतांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:27 IST2021-04-18T04:27:32+5:302021-04-18T04:27:32+5:30

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना विषाणूने तांडव सुरू केले आहे. बाधितांसह रुग्णमृत्यूनेही जिल्हा हादरत आहे. मागील २४ तासांत तब्बल २३ ...

Corona dies in Chandrapur district | चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूतांडव

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा मृत्यूतांडव

चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना विषाणूने तांडव सुरू केले आहे. बाधितांसह रुग्णमृत्यूनेही जिल्हा हादरत आहे.

मागील २४ तासांत तब्बल २३ बाधितांचा कोरोना विषाणूने बळी घेतला आहे. ५४९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर १५९३ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ४० हजार ६४७ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ३० हजार १०३ झाली आहे. सध्या ९९६९ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत तीन लाख २४ हजार ९४५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख ७७ हजार ४२४ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

बॉक्स

येथील आहेत २३ मृत्यू

२४ तासांत मृत झालेल्यांमध्ये वरोरा येथील ५० व ५५ वर्षीय पुरुष व ७२ वर्षीय महिला, एकार्जूना, वरोरा येथील ५३ वर्षीय पुरुष, गोरवट ता. चिमूर येथील ५४ वर्षीय पुरुष, चंद्रपूर येथील ७० वर्षीय पुरुष,

पथारी ता. सावली येथील ६५ वर्षीय पुरुष, तळोधी, ता. चंद्रपूर येथील ६६ वर्षीय पुरुष, सुनयनानगर चंद्रपूर येथील ६० वर्षीय महिला, मालविय वार्ड वरोरा येथील ७४ वर्षीय महिला, चंद्रपूर येथील ६० व ६८ वर्षीय पुरुष, वाॅर्ड नंबर ३, गोंडपिंपरी येथील ३८ व ६१ वर्षीय पुरुष, चेक बोरगाव येथील ५० वर्षीय महिला, गुरुदेवनगर धोपटाला राजुरा येथील ५८ वर्षीय पुरुष, पंचायत समिती नागभीड येथील ४९ वर्षीय पुरुष, वडसा येथील ४३ वर्षीय पुरुष, वडाला पायकू, चिमूर येथील ५० वर्षीय महिला, शेडगाव, ता. चिमूर येथील ७० वर्षीय पुरुष, गांधी नगर ब्रह्मपुरी येथील ७६ वर्षीय पुरुष, मेंडकी येथील ६६ वर्षीय पुरुष व कुर्झा, ता. ब्रह्मपुरी येथील ६० वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५७५ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ५२७, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली २२, यवतमाळ २०, भंडारा एक, गोंदिया एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

बॉक्स

तालुकानिहाय बाधित

चंद्रपूर महानगर पालिका -३८१

चंद्रपूर तालुका -८१

बल्लारपूर ६७

भद्रावती ७२

ब्रम्हपुरी १८१

नागभीड-११२

सिंदेवाही १०९

मूल ४६

सावली २१

पोंभुर्णा ९

गोंडपिपरी २०

राजुरा ४७

चिमूर २१७

वरोरा -१२८

कोरपना -७३

जिवती- १२

इतर - १७.

Web Title: Corona dies in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.