कोरोना अॅक्टीव रूग्ण एक हजार पार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 05:00 IST2021-03-19T05:00:00+5:302021-03-19T05:00:41+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २५ हजार २६४ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ८६४ झाली आहे. सध्या एक हजार ११ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दोन लाख ४० हजार ६१० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख १२ हजार २५२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपुरातील अरविंद नगरात राहणाऱ्या ६७ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात ४०७ बाधितांचे मृत्यू झाले.

कोरोना अॅक्टीव रूग्ण एक हजार पार!
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोना संसर्गाचा वेग दिवसागणिक वाढत असतानाच गुरूवारी अॅक्टीव रूग्णांची संख्या एक हजार पार झाली. मागील २४ तासात १३६ नवे पॉझिटिव्ह आढळले. चंद्रपुरातील एका बाधिताचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २५ हजार २६४ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ८६४ झाली आहे. सध्या एक हजार ११ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात दोन लाख ४० हजार ६१० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख १२ हजार २५२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यामध्ये चंद्रपुरातील अरविंद नगरात राहणाऱ्या ६७ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात ४०७ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी जिल्ह्यातील ३६८, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १९, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. कोरोनाचे रूग्ण सर्वच तालुक्यातुन आढळून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी मास्क घालणे, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचा नियमित वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
चंद्रपुरात ५३ तर भद्रावतीत १४ पॉझिटिव्ह
आज बाधित आढळलेल्या १३६ रूग्णांमध्ये चंद्रपूर क्षेत्रातील ५३, चंद्रपूर तालुका १२, बल्लारपूर आठ, भद्रावती १४, ब्रह्मपुरी ११, नागभीड आठ, सिंदेवाही तीन, मूल तीन, सावली दोन, राजुरा एक, चिमूर सात, वरोरा चार, कोरपना एक व इतर ठिकाणच्या नऊ रूग्णांचा समावेश आहे.
यापुढे रात्री ८ वाजतापर्यंत कोविड लसीकरण
उन्हाचे दिवस असल्याने नागरिकांच्या सोयीसाठी सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंत लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे. कोरोना तपासणीसाठी सर्व आरटीपीसीआर केंद्र लवकर बंद न करता सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरू राहणार आहे.
३५० बेड्स सज्ज ठेवणार
३५० बेड्सचे शासकीय महिला रूग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करावे, लिक्वीड ऑक्सिजन व औषधांचा पुरेसा साठा ठेवण्याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.