कोरोनाचा सामना करण्‍यासाठी प्रमुख अधिकाऱ्यांमध्‍ये समन्‍वय निर्माण व्‍हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:16 IST2021-03-29T04:16:12+5:302021-03-29T04:16:12+5:30

जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्‍या आटोक्‍यात आणण्‍याच्‍या दृष्‍टीने आरोग्‍य यंत्रणेचा आढावा घेण्‍यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्‍या विनंतीनुसार सार्वजनिक आरोग्‍य ...

Coordination should be created among the chief officers to deal with the corona | कोरोनाचा सामना करण्‍यासाठी प्रमुख अधिकाऱ्यांमध्‍ये समन्‍वय निर्माण व्‍हावा

कोरोनाचा सामना करण्‍यासाठी प्रमुख अधिकाऱ्यांमध्‍ये समन्‍वय निर्माण व्‍हावा

जिल्ह्यातील कोरोनाची वाढती संख्‍या आटोक्‍यात आणण्‍याच्‍या दृष्‍टीने आरोग्‍य यंत्रणेचा आढावा घेण्‍यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्‍या विनंतीनुसार सार्वजनिक आरोग्‍य मंत्री ना. राजेश टोपे यांनी ऑनलाईन बैठक घेतली. बैठकीला आ. सुधीर मुनगंटीवार, आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, जि. प. अध्‍यक्षा संध्‍या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्‍हाधिकारी अजय गुल्‍हाने, अधिष्‍ठाता डॉ. हूमणे, जिल्‍हा शल्‍य चिकीत्‍सक डॉ. राठोड, जिल्‍हा आरोग्‍य अधीक्षक डॉ. गहलोत, मनपा आयुक्‍त राजेश मोहीते आदींची उपस्थिती होती.

बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वाढती रूग्‍णसंख्‍या लक्षात घेता टेस्‍टींग वाढविण्‍याची मागणी केली. वैद्यकिय अधिकारी, तज्ज्ञ, नर्सेस यांची रिक्‍त पदे त्वरीत भरावी, कोरोना काळातील देयके प्रलंबित आहेत. अशी परिस्‍थीती राहिली तर प्रशासनाला कोण मदत करेल, असा सवालही त्‍यांनी केला. बेड मॉनिटरींग सिस्‍टीम उत्‍तम करावी, कॉल सेंटर निर्माण करावे, कंत्राटी कामगारांच्या ८ महिन्‍यांपासून थकीत वेतनाकडे लक्ष वेधले.

चंद्रपूर जिल्‍हयात कोरानाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता ऑस्‍कीजन बेड्स जास्‍तीत जास्‍त संख्‍येने निर्माण करावे, खाजगी डॉक्‍टरांच्‍या सेवा घ्‍यावा, रूग्‍णांना पोस्‍टीक जेवण द्यावे, आरोग्‍य सेवेचा दर्जा सुधारावा, कॉन्‍टेक्‍ट ट्रेसींग वाढवावे असे विविध निर्देश आरोग्‍यमंत्र्यांनी जिल्‍हाधिका-यांना दिले. लसीकरणात चंद्रपूर जिल्‍हा अव्‍वल ठरावा अशी अपेक्षा सार्वजनिक आरोग्‍य मंत्री राजेश टोपे यांनी व्‍यक्‍त केली.

Web Title: Coordination should be created among the chief officers to deal with the corona