राज्य कर्मचारी संघटनेचे पार पडले अधिवेशन
By Admin | Updated: February 11, 2015 01:08 IST2015-02-11T01:08:25+5:302015-02-11T01:08:25+5:30
महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात जिल्हा अधिवेशन ....

राज्य कर्मचारी संघटनेचे पार पडले अधिवेशन
चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना जिल्हा शाखा चंद्रपूरच्या वतीने प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात जिल्हा अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
अध्यक्षस्थानी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस सुनील जोशी होते. उद्घाटक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, प्रमुख अतिथी मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, जिल्हा परिषद महासंघाचे सरचिटणीस अशोक थुल, विभागीय उपाध्यक्ष चंद्रहास सुटे, माजी कार्याध्यक्ष गजानन शेट्टे, विभागीय सहचिटणीस लीलाधर पाथोडे, आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी र.ग. कर्णिक यांचे व्यक्तिमत्व, संघटनेचे कार्य व जबाबदारी, नागरिकांच्या अपेक्षा, नवीन आव्हाने तसेच शासन उपक्रम याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संजय ठाकरे यांनी टिम वर्क, सामाजिक उपक्रमात सहभाग, सकारात्मक दृष्टीने करावे लागणारे प्रयत्न याबद्दल मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात लिलाधर पाथोडे, चंद्रहास सुटे आदींनी आपले विचार व्यक्त केले.
मार्गदर्शक अशोक थुल, सुनील जोशी यांनी परिभाषित अंशदायी निवृत्ती योजनेवर समस्या व समाधान आणि संघटनेपुढील भविष्यातील आव्हाणे या विषयावर मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रातील कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन शेट्टे यांनी त्यांच्या जीवनातील अनुभव, अंशदायी निवृत्ती योजना, संपाची भुमिका, संघटनेचे महत्व, १०० टक्के वर्गणी जमा करणे आदी विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्राचे प्रास्ताविक दीपक जेऊरकर यांनी तर दुसऱ्या सत्रातील प्रास्ताविक रमेश पिंपळशेंडे यांनी केले. संचालन प्रकाश गंटावार, माधुरी संतोषवार यांनी केले. आभार जयदिप साधनकर, सुर्यभान झाडे यांनी मानले. चंद्रपूर जिल्ह्यातील विविध कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिवेशनाच्या पदाधिकारी तथा सदस्यांनी परिश्रम घेतले. (नगर प्रतिनिधी)