‘आॅस्ट्रेलियन रडार’ मशीन ठेवणार वेकोलिच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण

By Admin | Updated: October 20, 2015 00:59 IST2015-10-20T00:59:22+5:302015-10-20T00:59:22+5:30

कोल इंडियामध्ये प्रथमच बल्लारपूर क्षेत्रामधील सास्ती उपक्षेत्रात ‘आस्ट्रेलियन स्लोब स्टॅबीलीटी रडार’चा शुभारंभ भारत

Control of Waikolini's method of keeping 'Australian radar' machine | ‘आॅस्ट्रेलियन रडार’ मशीन ठेवणार वेकोलिच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण

‘आॅस्ट्रेलियन रडार’ मशीन ठेवणार वेकोलिच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण

राजुरा : कोल इंडियामध्ये प्रथमच बल्लारपूर क्षेत्रामधील सास्ती उपक्षेत्रात ‘आस्ट्रेलियन स्लोब स्टॅबीलीटी रडार’चा शुभारंभ भारत सरकारचे केंद्रीय उर्वरक व रसायन मंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते करण्यात आला.
सात कोटी पन्नास लाख रूपये किंमतीची ही आॅस्ट्रेलियन रडार ही मशीन पहिल्यादाच बसविण्यात आली असून वेकोलिच्या कार्यपद्धतीवर नियंत्रण ठेवणार आहे. यासोबत सौर उर्जा प्रकल्पाचा शुभारंभ यावेळी करण्यात आला. यापासून वेकोलि कार्यालयाला यापुढे विजेची गरज भासणार नाही. सास्ती ओपन कास्टमध्ये झालेल्या या उद्घाटन सोहळ्याला प्रामुख्याने राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, वेकोलिचे सहप्रबंध निदेशक राजीवरंजन मिश्र, वेकोलि बल्लारपूर क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक एस.के. वैश्वकियर उपस्थित होते. तर राजुरा वेस्टर्न कोलफील्ड बल्लारपूर क्षेत्राच्या वतीने पवनी परियोजना भूमी अधिग्रहन केल्याबद्दल शेतकऱ्यांना ५० कोटीचे धनादेश वितरण २० आॅक्टोबरला साखरी येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला भारत सरकारचे केंद्रीय व उर्वरक मंत्री हंसराज अहीर, राजुराचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, वेकोलिचे राजीव रंजन मिश्र, खुशाल बोंडे, एस.के. वैश्वकियार उपस्थित राहणार आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Control of Waikolini's method of keeping 'Australian radar' machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.