‘मुद्रा’ कर्जावर धनिकांचा ताबा

By Admin | Updated: February 12, 2016 01:37 IST2016-02-12T01:37:09+5:302016-02-12T01:37:09+5:30

केंद्र सरकारने सुरू केलेल्या मुद्रा कर्ज योजनेवर सध्या लोकप्रतिनिधी आणि धनिकांचा ताबा दिसत आहे.

Control of money on 'currency' loan | ‘मुद्रा’ कर्जावर धनिकांचा ताबा

‘मुद्रा’ कर्जावर धनिकांचा ताबा

सामान्यांना नो एन्ट्री : कर्ज वाटपाचा अहवाल गुलदरस्त्यात
सिंदेवाही : केंद्र सरकारने सुरू केलेल्या मुद्रा कर्ज योजनेवर सध्या लोकप्रतिनिधी आणि धनिकांचा ताबा दिसत आहे. राष्ट्रीयकृत बँका सर्वसामान्यांच्या अर्जाला कचरापेटी दाखवित आहे. आतापर्यंत जवळपास १ कोटी रुपयांचे कर्ज वाटप झाले असले तरी अग्रणी बँकेने हा अहवाल गुलदस्त्यात ठेवला आहे. यावर बँकेचे व्यवस्थापक बोलायला तयार नसल्याचे दिसून येते.
बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे म्हणून केंद्र सरकारने मुद्रा कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेत कर्ज वाटपाचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात मुद्रा योजनेतील कर्ज वाटपाची उद्दीष्ट अग्रणी बँकेने दडवून ठेवले आहे. तर लोकप्रतिनिधी व स्थानिक धनदांड्यांनी याचा फायदा घेणे सुरू केले आहे. या योजनेत आतापर्यंत १५० ते २०० नागरिकांनी जवळपास १ कोटी रुपयांपर्यंत कर्ज वितरीत करण्यात आल्याचे समजते. मात्र हा संपूर्ण अहवाल गुलदस्त्यात ठेवण्यात आला आहे.
एवढेच नाही तर या योजनेची माहिती देण्यासही बँकेचे व्यवस्थापक टाळाटाळ करीत आहेत. साधा छापील अर्जही दिला जात नाही. तालुक्यातील हजारवर अर्ज सादर केल्याची माहिती आहे. परंतु सर्व कचऱ्याच्या पेटीत टाकण्यात आले आहे. विशेष म्हणजे ज्या अर्जदारांना कर्ज बँकांनी दिला, त्यांनी कोणता व्यवसाय सुरू केला, याची माहितीही शाखा व्यवस्थापकाला नाही. नॅशनल बँकेचे शाखा व्यवस्थापक सर्व नागपूर, ब्रह्मपुरी, चंद्रपूर या येथे राहत असल्याकारणाने फक्त उद्दिष्टपूर्ण करणे हा त्यांचा हेतु आहे, असे समजते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Control of money on 'currency' loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.