बचत गटाचे महिलांच्या सक्षमीकरणात योगदान - घोटेकर
By Admin | Updated: July 11, 2017 00:32 IST2017-07-11T00:32:29+5:302017-07-11T00:32:29+5:30
महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती मिळाली आहे. पदरी पैसा आला की, ...

बचत गटाचे महिलांच्या सक्षमीकरणात योगदान - घोटेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला गती मिळाली आहे. पदरी पैसा आला की, घरातील आदर, समाजातील मान्यता व आत्मविश्वासही वाढतो. त्यामुळे बचत गटांच्या या यंत्रणेत महिलांचा सहभाग वाढवा, असे आवाहन महापौर अंजली घोटेकर यांनी केले.
खुशिया लोकसंचालित साधन केंद्र यांची आठवी सर्वसाधारण सभा महिलांच्या गौरव साहेळयात त्या बोलत होत्या. आज जी आर्थिक घडी महिला बचत गटात सहभागी झाल्यामुळे झाली आहे. ती अन्य महिलांची झाली पाहिजे. यासाठी बचत गटांचे जाळे महानगरातील दूर्लक्षित व गरीब वस्त्यांमध्ये वाढवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तेजस्विनी महिला सक्षमीकरण कार्यक्रम अंतर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ द्वारा स्थापित खुशिया लोक संचालित साधन केंद्र चंद्रपूर व समाज कल्याण विभाग जि.प. चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर जि.प.सभापती ब्रिजभुषण पाझारे, ताडोबा प्रकल्प उपसंचालक जी. पी. नरवणे, नाबार्डचे महाप्रबंधक आदिनाथ टेले, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे, सहायक समन्वय अधिकारी योगिता साठोणे, संगिता मेश्राम, खुशिया सीएमआरसीच्या व्यवस्थापक शारदा हुसे व सर्व खुशिया साधन केंद्राच्या सदस्या आदीची कार्यक्रमाला उपस्थिती होती.
चंद्रपूरसारख्या महानगरात इतक्या मोठया प्रमाणात महिला बचत गटाचे आयोजन केल्याबद्दल त्यांनी शारदा हुसे यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या जिल्हा समन्वय अधिकारी नरेश उगेमुगे यांचे कौतुक केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी देखील संबोधित करुन महिला बचत गटांनी वेगवेगळया आयोजनामध्ये आपला ठसा उमटवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.