दुचाकीने भ्रमंती : वन्यजीवांची छायाचित्रेही काढलीचंद्रपूर : राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्पात कुण्याही व्यक्तीला दुचाकीने प्रवास करण्याची मुभा नसते. ज्यांची गावे जंगलात आहेत अथवा वनविभाने कामासाठी नेमून दिलेल्या व्यक्तींनाच अपवादात्मक स्थितीत तशी मुभा असते. मात्र त्यांना जंगलात कसलेही चित्रीकरण करता येत नाही. असे असले तरी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वनविभागांतर्गत काम करणाऱ्या एका कंत्राटदाराने आगाऊपणा करीत आपल्या दुचाकीने कोअर झोनमध्ये प्रवेश केला. एवढेच नाही तर, आपल्या मोबाईलने वन्यजीवांची छायाचित्रे काढून ती फेसबुकवरही डाऊनलोड केलीत. यामुळे एक नवा वाद निर्माण झाला आहे.शनिवारी दुपारी संबंधित कंत्रादाराने ही छायाचित्र आपल्या फेसबुकवरून प्रकाशित केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. संबंधीत व्याक्ती कोण याचा शोध घेतला असता, त्याचे नाव प्रशांत काळे असून तो वनविभागातील ठेकेदारी कामावर असल्याची माहिती पुढे आली आहे. केवळ गंमत म्हणून आपण ही छायाचित्र काढली, असे त्याचे म्हणणे आहे. या संदर्भात शहरातील वन्यजीवप्रेमींनी वनविभाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपवनसंरक्षक जी.पी. गरड यांनी दिले आहे. (जिल्हा प्रतिनिधी) संबंधित व्यक्ती वनविभागात कंत्राटदार म्हणून कार्यरत आहे. कामानिमीत्त त्याला जंगलात जाण्याची परवानगी आहे. मात्र छायाचित्रणाची नाही. त्याच्या या कृत्याबद्दल आपण जाब विचारला असून अडीच हजार रूपये दंडाची शिफारस केली आहे. एवढेच नाही तर त्याचे टॅ्रक्टर जप्त करून काम बंद केले जाईल. -जी.पी. गरड, उपवनसंरक्षक, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प
ताडोबा अभयारण्यात ठेकेदाराचा प्रताप
By admin | Updated: February 28, 2016 01:07 IST