शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

राईस मिलमधील दूषित पाणी थेट संरक्षित जंगलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 13:13 IST

Chandrapur : वन्यप्राण्यांच्या जीवितासह अधिवासालाही धोक्याची शक्यता

दत्तात्रय दलाललोकमत न्यूज नेटवर्क ब्रह्मपुरी : संरक्षित जंगल, जंगलातील वन्यप्राण्यांचा अधिवास व वन्यप्राण्यांची सुरक्षा अबाधित राखण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र, या विपरीत चक्क राईस मिलमधील केमिकलयुक्त पाणी थेट संरक्षित जंगलात, वन्यप्राण्यांच्या अधिवासात सोडत असल्याचा प्रकार ब्रह्मपुरी वनविभागात कक्ष क्र. ८४१ मध्ये सुरू आहे.

या केमिकलयुक्त पाण्यामुळे वन्यप्राण्यांसह जंगलालाही धोका निर्माण होत आहे. याकडे ब्रहापुरी वनविभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने वरिष्ठ स्तरावरून उचित कारवाई होणार काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. ब्रह्मपुरी-नागभीड मुख्य महामार्गालगत डाव्या बाजूला असलेल्या एका राईस मिलधारकाकडून चक्क रस्त्याच्या खालून भूमिगत पाइप टाकून मिलमधील केमिकलयुक्त पाणी रस्त्याच्या उजव्या बाजूला सायगाटा संरक्षित जंगल गट क्र. ८४१ मध्ये सोडण्यात येत आहे. सायगाटामधून पुढे लाखापूर जंगल परिसरात हे दूषित पाणी पोहोचते. या जंगलात वाघ, बिबट यांच्यासह अस्वल, हरीण, रानगवा, चितळ, मोर तथा अनेक वन्यप्राण्यांचा मोठा अधिवास आहे. सोडण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त पाण्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीवितास केव्हाही धोका निर्माण होऊ शकतो. तर त्यांचा अधिवासही धोक्यात आलेला आहे. राखीव किंवा संरक्षित जंगलात सामान्य नागरिकांना प्रवेश करता येत नाही. असे आढळून आल्यास त्यांच्यावर वनकायद्यानुसार कारवाई करण्यात येते. वन्यजीवांची शिकार झाल्यास कठोर शिक्षेचे प्रावधान आहे; मात्र या सोडण्यात येणाऱ्या केमिकलयुक्त पाण्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीवितास व अधिवासाला धोका होण्याची शक्यता आहे.

प्रजननासाठी अनुकूल जंगलब्रह्मपुरी वनविभाग उत्तर-दक्षिण असा ३० हजार हेक्टरमध्ये विस्तीर्ण पसरला आहे. येथील जैवविविधता पोषक असल्याने वाघांसह अनेक वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात अधिवास आढळून येतो. वाघ व बिबट यांच्या प्रजननाकरिता उत्कृष्ट जंगल असल्याने वाघ व बिबट (मादी) यांच्यासह अनेक वन्यप्राणी जंगलात बछड्यांना जन्म देतात. त्यामुळे वन्यप्राण्यांची संख्या मोठी आहे. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन्यप्राण्यांचा अधिवास असलेल्या घनदाट जंगलाला संरक्षित घोषित करण्यात येते.

"आर.एफ.ओ. यांना या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी पाठवितो. मिलचे केमिकलयुक्त पाणी जंगलात सोडण्यात येत असेल तर वनकायद्यानुसार कारवाई करण्यात येईल."- दिपेश मल्होत्रा, उपवनसंरक्षक, ब्रह्मपुरी

"नगाभीड महामार्गावरील राईस मिलमधून मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त पाणी संरक्षित जंगलात सोडण्यात येत आहे. या दूषित पाण्यामुळे वन्यप्राणी व वृक्षांना धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात मुख्य वनसंरक्षक चंद्रपूर यांच्याकडे मी कारवाईची मागणी करणार आहे."- विवेक करंबेळकर, मानद वन्यजीव रक्षक, ब्रह्मपुरी, जिल्हा चंद्रपूर 

टॅग्स :water pollutionजल प्रदूषणforestजंगलwildlifeवन्यजीवchandrapur-acचंद्रपूर