नवव्या वर्गाच्या मराठी कृती पत्रिकेत भौमितिक आकृत्यांचा समावेश

By Admin | Updated: October 19, 2015 01:36 IST2015-10-19T01:36:53+5:302015-10-19T01:36:53+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावर....

Contains geometrical figures in the 9th class Marathi action sheet | नवव्या वर्गाच्या मराठी कृती पत्रिकेत भौमितिक आकृत्यांचा समावेश

नवव्या वर्गाच्या मराठी कृती पत्रिकेत भौमितिक आकृत्यांचा समावेश

शिक्षकांत असंतोष : दोषयुक्त आॅनलाईन प्रशिक्षण
भिसी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीस्तरावर दोन तालुके मिळून ९ वीच्या प्रथम भाषा मराठीच्या बदललेल्या प्रश्नपत्रीकेसंदर्भात नुकतेच आॅनलाईन प्रशिक्षण झाले. या प्रशिक्षणात प्रश्न पत्रिकेऐवजी कृतीपत्रिकेचा आराखडा व माहिती देण्यात आली. ही कृतीपत्रिकाच मराठी भाषेच्या दृष्टीने चुकीची असल्यामुळे शिक्षण मंडळाने त्वरीत बदल करुन पूर्वीची प्रश्नपत्रिका ठेवावी, अशी विनंती मागणी महाराष्ट्र मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे राज्यध्यक्ष व मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य विजयकुमार लांडगे यांनी केली आहे.
राज्यात एकाच दिवशी झालेले आॅनलाईन प्रशिक्षण दोषयुक्त असल्यामुळे प्रशिक्षणासाठी आलेल्या शिक्षक-शिक्षिकांना अर्धवट माहिती मिळाली. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड नाराजी पसरली झाली आहे. या नवीन कृतिपत्रीकेत भौमितीक रचना आकृत्यांवर प्रश्ननिशी भर देऊन मराठीची भूमिती केली आहे. प्रथम भाषा मराठीची प्रश्नपत्रिका वाटत नाही.
महाराष्ट्र माध्यमिक मराठी संघ राज्यात ३४ वर्षापासून सक्रीय कार्य करीत असताना शिक्षण मंडळाच्या अध्यक्षानी कृतीपत्रिकेच्या संदर्भात साधी माहिती संघाला कळविली नाही. शिक्षकांनी पाठ किंवा कविता कशी शिकवायची, की निव्वळ न शिकविता कृतीवर आकृत्या काढण्यावर भर द्यायचे, असे अनेक प्रश्न अंधातरी आहेत. त्यामुळे इयत्ता ९ वीला प्रथम भाषा मराठी शिकविणारे शिक्षक गोंधळून गेले आहेत.
प्रथम सत्र परिक्षा पंधरा दिवसांवर असून शिक्षकांची मानसिकता कृतिपत्रिकेला स्वीकारण्यास तयार नाही.
विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये, असे शिक्षकांना वाटते. कारण नवव्या वर्गावर दहावा वर्ग आधारलेला असतो. राज्य शासन मराठीच्या अस्तित्वासाठी अस्मितेस प्रथम प्राधान्य देत असताना शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी अभ्यासक्रम न बदलविता कृती पत्रिकेचे सोंग उभे केले, हे योग्य नाही.
शिक्षण मंडळाने ही कृतीपत्रिका बदलवून पूर्वी प्रमाणेच प्रश्नपत्रिकेची रचना ठेवावी, अशी विनंती मराठी माध्यमिक शिक्षक संघाचे दीपक दोंदल, भुंजगराव खंदारे, रमाकांत देशपांडे, सुनिता भगवत, बाबुराव कांबळे, विलास पाटील, ज्ञानेश्वर शिरभैय्ये यांनी केली आहे. यावर शासनाने कार्यवाही करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Contains geometrical figures in the 9th class Marathi action sheet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.