कंटेनरला दुसऱ्या कंटेनरची धडक

By Admin | Updated: September 18, 2016 00:48 IST2016-09-18T00:48:25+5:302016-09-18T00:48:25+5:30

नागपूर-चंद्रपूर मार्गावर एका कंटेनरने शनिवारी दुसऱ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली.

The container is hit by another container | कंटेनरला दुसऱ्या कंटेनरची धडक

कंटेनरला दुसऱ्या कंटेनरची धडक

दुचाकीचा चेंदामेंदा : दुचाकीस्वार बचावले
नंदोरी : नागपूर-चंद्रपूर मार्गावर एका कंटेनरने शनिवारी दुसऱ्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. त्यानंतर एक दुचाकीलाही धडक दिली. या अपघातात नशीब बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार थोडक्यात बचावले.
नागपूर-चंद्रपूर महामार्गावर नंदोरी बसथांब्याजवळ चंद्रपूरहून नागपूरकडे जात असलेल्या कंटेनरला मागून भरधाव येणाऱ्या कंटेनर क्रमांक एमएच ३४, ४० एन २६३६ ने ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे कंटेनर चालकाचा ताबा सुटल्याने बाजूने जात असलेल्या दुचाकी क्र. एमएच ३४ वाय २१२३ लाही जोरदार धडक बसली. ता प्रचंड धडकेने दुचाकीस्वार शरद डोर्लीकर (रा. भद्रावती) व त्यांचा सहकारी बंडू पिंपळकर फेकल्या गेले. दोघेही रोडवर पडल्यानंतर प्रसंगावधान राखून बंडू पिंपळकर यांनी शरद डोर्लीकर यांना रस्त्याच्या बाजूला ओढले. दुचाकी अपघातग्रस्त कंटेनरच्या चाकाखाली दबल्या गेली. सुदैवाने प्राणहाणी टळली असून दुखापती झाल्या आहेत. कंटेनर चालक व दुचाकीच्या अपघातग्रस्तांना वरोरा येथील ग्रामीण रुग्णालय रुग्णवाहिकेतून नेण्यात आले आहे. जेसीबीच्या सहाय्याने कंटेनरखाली दबलेली दुचाकी काढण्यात आली. तसेच कंटेनरचालकाविरुद्ध भादंवि २७९, ३७, ४२७ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: The container is hit by another container