पशुवैद्यकीय इमारतीचे बांधकाम थंडबस्त्यात
By Admin | Updated: June 1, 2017 01:31 IST2017-06-01T01:31:49+5:302017-06-01T01:31:49+5:30
पशु-प्राण्यांवर गावातच योग्य उपचार व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेने १६ लाख १६ हजार रुपये मंजुर केले.

पशुवैद्यकीय इमारतीचे बांधकाम थंडबस्त्यात
घनश्याम येनुरकर : तात्काळ काम पूर्ण करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मूल : पशु-प्राण्यांवर गावातच योग्य उपचार व्हावा, यासाठी जिल्हा परिषदेने १६ लाख १६ हजार रुपये मंजुर केले. सदर काम मूल येथील एका कंत्राटदाराला मिळाले. कंत्राटदाराने केवळ फाउंडेशनपर्यंत काम केले व बंद केले आज वर्षे लोटून गेला परंतु अजुनही कामाला सुरुवात केलेले नाही. यामुळे शाळेच्या खोलीमध्ये पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम करावे लागत आहे. पशुवैद्यकीय इमारतीचे काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी भाराकाँचे तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर यांनी केले आहे.
नागरिकांची मागणी लक्षात घेवून जिल्हा परिषदेने मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथे १६.१६ लाख रुपये खर्च करून पशुवैद्यकीय इमारतीचे बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. कामाची निविदा काढण्यात आली. सदर काम मूल येथील मुरकुटे नामक कंत्राटदाराला काम मिळाले, कंत्राटदारांनी फाऊंडेशन पर्यंतचे काम मागील वर्षी केले आणि बिल टाकून पैसे उचलले. व काम बंद केले. परंतु, उर्वरीत काम अजूनपर्यंत पूर्ण केलेले नाही. वर्षभरापासून सदर काम थंडबस्त्यात आहे. याकडे जिल्हा परिषदेचेही दुर्लक्ष होत आहे.
येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातंर्गत सदर काम सुरू आहेत. परंतु, कंत्राटदार आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने सदर काम रेंगाळत आहे.
४ मार्च २०१४ ला सदर कामाचा करारनामा झाला. सदर काम पूर्ण करण्याचा कालावधी १२ महिन्याचा होता. परंतु, आज तीन वर्षाचा कालावधी लोटून गेला. मात्र काम पूर्ण झालेले नाही.
यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना शाळेतील खोलीचा आसरा घ्यावा लागत आहे. याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
सदर काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी भारतीय राष्ट्रवादी कॉग्रेसचे मूल तालुकाध्यक्ष घनश्याम येनुरकर यांनी केली आहे.