वलनी येथे सिमेंट काँक्रीट रस्ते बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:34 IST2021-07-07T04:34:53+5:302021-07-07T04:34:53+5:30
तळोधी गोविंदपूर जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य खोजराम मरस्कोल्हे यांच्या प्रयत्नातून वलनी येथील ग्रामपंचायत अंतर्गत विविध सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या बांधकामाचे ...

वलनी येथे सिमेंट काँक्रीट रस्ते बांधकाम
तळोधी गोविंदपूर जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य खोजराम मरस्कोल्हे यांच्या प्रयत्नातून वलनी येथील ग्रामपंचायत अंतर्गत विविध सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये सुनंदा मरस्कोल्हे ते ईश्वर ठिकरे यांच्या घरापर्यंत, नांदेड मुख्य रोड ते तुळशीदास पर्वते यांच्या घरापर्यंत व मेंढा (चारगाव), विसावा ते मुख्य रोडपर्यंत या सिमेंट काँक्रीट रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे. याप्रसंगी सदर कामांचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य खोजराम मरस्कोल्हे, सरपंच अनिल बोरकर, उपसरपंच प्रकाश मसराम, ग्रा. पं. सदस्य दिनकर पर्वते, ग्रा. पं. सदस्य उर्मिला उईके, ललिता राऊत, शुभांगी वलके, तथा ग्रामपंचायत कर्मचारी यांची उपस्थिती होती.