जिल्हा नियोजन निधीतून अंगणवाडी बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:26 IST2021-03-28T04:26:19+5:302021-03-28T04:26:19+5:30

घुग्घुस : जिल्हा नियोजन फंडातून मंजूर साडेआठ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नकोडा येथील अंगणवाडीचे बांधकाम सुरू करण्यात ...

Construction of Anganwadi from District Planning Fund | जिल्हा नियोजन निधीतून अंगणवाडी बांधकाम

जिल्हा नियोजन निधीतून अंगणवाडी बांधकाम

घुग्घुस : जिल्हा नियोजन फंडातून मंजूर साडेआठ लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या नकोडा येथील अंगणवाडीचे बांधकाम सुरू करण्यात आले.

जि.प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांच्या हस्ते या कामाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच किरण बांदूरकर, उपसरपंच मंगेश राजगडकर, ग्रा.पं.सदस्य तनुश्री बांदूरकर, माजी सरपंच ऋषी कोवे, भाजपचे बाळकृष्ण झाडे, ग्रा. पं. सदस्य सुजाता गीते, जसबीर कौर, हेमा चंदर ताला, रजत तुरणकार यांची उपस्थिती होती.

नकोडा ग्रा. पं. वार्ड क्र ५ मधील मुलांना अंगणवाडी सोय उपलब्ध व्हावी, यासाठी या क्षेत्राचे जि.प. सदस्य व माजी समाज कल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी जिल्हा नियोजनकडे निधीची मागणी केली होती. ती पूर्ण झाली.

Web Title: Construction of Anganwadi from District Planning Fund