प्राचीन ऐतिहासिक डोलारा तलावाचे संवर्धन करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:29 IST2021-03-27T04:29:34+5:302021-03-27T04:29:34+5:30
भद्रावती : येथील प्राचीन डोलारा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोने शहरातील नागरिकांना सोबत घेऊन स्थापन केलेल्या डोलारा तलाव संवर्धन ...

प्राचीन ऐतिहासिक डोलारा तलावाचे संवर्धन करा
भद्रावती : येथील प्राचीन डोलारा तलावाच्या संवर्धनासाठी इको-प्रोने शहरातील नागरिकांना सोबत घेऊन स्थापन केलेल्या डोलारा तलाव संवर्धन समितीच्या वतीने नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी या तलावाच्या संवर्धनासाठी प्रयत्न चालू असल्याचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी सांगितले. शहराच्या पर्यावरण आणि सौंदर्याच्या दृष्टीने प्राचीन ऐतिहासिक तलाव अग्रगण्य आहे. या तलावात प्राचीन ३४ खांबी दगडाचा पुल आहे. नागपूर-चंद्रपूर या मार्गालगत तलाव शहरीकरणामुळे अतिक्रमण होऊन लहान होत चालले आहे. ते असेच राहिल्यास पूर्ण तलावच अतिक्रमणाच्या विळख्यात गेल्याशिवाय राहणार नाही. शहरातील भूजल पातळी सुद्धा खोल गेली आहे. याचा विचार करून इको प्रो च्या सदस्यांनी पुढाकार घेऊन इको प्रोचे जिल्हाध्यक्ष बंडू धोत्रे यांच्या उपस्थितीत डोलारा तलावात चिंतन बैठक घेण्यात आली. यावेळी शहरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी तलाव संवर्धन समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर नगराध्यक्ष धानोरकर आणि मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी डॉक्टर विवेक शिंदे, गुणवंत कुत्तरमारे, विशाल गावंडे, भिकमचंद बोरा, केशव मेश्राम, पुरुषोत्तम मत्ते, दिलीप ठेंगे, दिलीप मांढरे, शरद लांबे, मुकेश मिश्रा, इको-प्रोचे संदीप जीवने, किशोर खंडाळकर, अमोल दौलतकर, शुभम मेश्राम, हनुमान घोटेकर, सुनिता खंडाळकर, विश्रांती उराडे, स्वाती चारी, वर्षा पडाल,यांचेसह इतर उपस्थित होते.