इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसचे धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:22 IST2021-02-20T05:22:36+5:302021-02-20T05:22:36+5:30

जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनात पेट्रोल, डिझेल व गॅस इंधन आवश्यक बाब आहे. यांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती सर्व सामान्यांचे कंबरडे मोडत ...

Congress's stand against fuel price hike | इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसचे धरणे

इंधन दरवाढ विरोधात काँग्रेसचे धरणे

जनसामान्यांच्या दैनंदिन जीवनात पेट्रोल, डिझेल व गॅस इंधन आवश्यक बाब आहे. यांच्या गगनाला भिडणाऱ्या किमती सर्व सामान्यांचे कंबरडे मोडत आहे. या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन दरवाढ कमी करावी व सामान्य माणसाला न्याय मिळवून द्यावा, असे प्रतिपादन नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी आंदोलनात मार्गदर्शन करताना केले.

याप्रसंगी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रंजन लांडे, विधानसभा युवक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष एजाज अहमद, संजय गांधी निराधार योजना राजुराचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, पं.स. उपसभापती मंगेश गुरनुले, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष संतोष गटलेवार, तालुका युवक कॉंग्रेस अध्यक्ष संतोष शेंडे, शहर युवक काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक राव, नगरसेवक आनंद दासरी, गजानन भटारकर, गीता रोहणे, साधना भाके, संतोष इंदुरवर, इरशाद शेख, आकाश मावलीकर, प्रणय लांडे, नीरज मंडळ, रामभाऊ डुमणे, विनोद दरेकार, हेमंत दाते,उमेश गोरे, आकाश चोथले व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Congress's stand against fuel price hike