केंद्र सरकारच्या विरोधात कॉंग्रेसची निदर्शने
By Admin | Updated: April 6, 2016 00:50 IST2016-04-06T00:50:48+5:302016-04-06T00:50:48+5:30
उत्तराखंड, अरूणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप करीत मंगळवारी चंद्रपूर ..

केंद्र सरकारच्या विरोधात कॉंग्रेसची निदर्शने
चंद्रपूर: उत्तराखंड, अरूणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करून लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप करीत मंगळवारी चंद्रपूर जिल्हा शहर कॉंग्रेस कमिटीच्यावतीने स्थानिक जटपुरा गेट येथील गांधी पुतळ्यासमोर केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
या आंदोलनोच नेतृत्व चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू नागरकर, डॉ.विजय देवतळे, के.के. सिंग, अॅड.विजय मोगरे, विनोद संकत यांनी केले. या आंदोलनात कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार नारेबाजी करून भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा तिव्र निषेध केला.
या आंदोलनात अनिल सुरपाम, सुलेमान अली, घनश्याम वासेकर, विजय आडकुजी चहारे, वंदना भागवत, अॅड. भास्कर दिवसे, अनिल शिंदे, मोहन डोंगरे, अशोक दुसैलवार, अॅड. मलक शाकीर, अनवर अली, दीपक कटकोजवार, सागर वानखेडे, राजा काझी, श्याम राजुरकर, संतोष कुर्रा, निरंजन भगत, रमन राठोड, बबनराव देयंदीवार, प्रवीण मेश्राम, सागर खोब्रागडे, मोहम्मद अनिस, लक्ष्मण झिंका, राहुल पांडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)