रोहित वेमुला मृत्यूप्रकरणी काँग्रेसचे निवेदन
By Admin | Updated: February 4, 2016 01:03 IST2016-02-04T01:03:01+5:302016-02-04T01:03:01+5:30
भाजपाचे सरकार स्थापन झाल्यापासून देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजाच्या घटकांवर अत्याचार वाढत आहेत.

रोहित वेमुला मृत्यूप्रकरणी काँग्रेसचे निवेदन
चंद्रपूर : भाजपाचे सरकार स्थापन झाल्यापासून देशात असहिष्णुतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसेंदिवस दलित, मागासवर्गीय, अल्पसंख्याक समाजाच्या घटकांवर अत्याचार वाढत आहेत. हैदराबाद विद्यापीठातील दलित विद्यार्थी रोहीत वेमुलाची आत्महत्या म्हणजे तोच प्रकार असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. या घटनेबाबत चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीने रोहितच्या निधनावर जबाबदार असणाऱ्या भाजप पक्षाशी संबंध असणारे बंडारू दत्तात्रेय व स्मृती इराणी व जे जबाबदार आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदू संभाजी नागरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव सुनीता लोढीया चंद्रपूर जिल्हा (शहर) काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अॅड. विजय मोगरे, महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती जमाती महासचिव संजय रत्नपारखी, अॅड. भास्कर दिवसे, राजु सारीडेक, केशव रामटेके, जहीर काझी, मनीष चौधरी, निखिल धनवलकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)